Diwali 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali 2023: घरापासून दूर अन् एकटे राहत असाल तर 'या' खास पद्धतीने करा दिवाळी साजरी

यंदा तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर असाल आणि एकटे राहत असाल तर दिवाळी कशी साजरी करायची हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Diwali 2023: दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी. आज देशभरात मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केला जात आहे. दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. हा सण कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा केला जातो. तुम्ही जर एकटे राहत असाल आणि घरापासून दूर असाल तर तुम्ही ही दिवाळी खास बनवू शकता.

व्हिडिओ कॉलवर फॅमिलीसोबत बोलावे

दिवाळीत तुम्ही तुमच्या कुटुंबापासून आणि घरापासून दूर असाल आणि त्यांना मिस करत असाल, तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना व्हिडिओ कॉल करू शकता. लक्ष्मी पूजेच्या वेळी देखील व्हिडिओ कॉल करून पुजात सहभागी व्हा. त्यांना तुमच्या तयारीचे फोटो आणि सेल्फी पाठवून तुमचे प्रेम दाखवा. दूर असूनही, तंत्रज्ञानाशी कनेक्ट रहा आणि दिवाळीचा आनंद घ्या.

चांगले पदार्थ तयार करा

दिवाळीच्या दिवशी तुम्ही तुमचे आवडते पदार्थ आणि मिठाई स्वतः तयार करू शकता. यामुळे तुम्हाला स्वयंपाकाचा आनंद मिळेल आणि घर बनवलेले पदार्थ खाण्याचाही एक वेगळाच आनंद असेल. त्यामुळे एकटे राहिल्याने दु:खी होऊ नका आणि दिवाळी आनंदाने साजरी करा. उत्तम पदार्थ खाऊन दिवाळीचा आनंद घ्या.

घर सजवा

दिवाळीनिमित्त घर छान सजवु शकता. त्यामुळे उत्सवाचे वातावरण निर्माण होते. सजावट केल्यानंतर ते आपल्या कुटुंबाला दाखवा. हे पाहून त्यालाही खूप आनंद होईल. तुम्ही तुमचे घर सजवून दिवाळी साजरी करू शकता. रंगीबेरंगी दिवे लावावे, लाइटिंगने सजावट करावी. रंगबिरंगी रोषणाई करा. दिवाळी हँगिंग्ज आणि भिंतीची सजावट करा. जमिनीवर रांगोळी काढवी. तुम्ही तुमचे घर सजवून दिवाळीचे सौंदर्य वाढवू शकता आणि सणाचा आनंद लुटू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

Viral Video: रस्त्याच्या मधोमध सांडांची WWE स्टाईल फाईट! स्कूटीवरुन जाणारी तरुणी सापडली कचाट्यात; थरारक व्हिडिओ व्हायरल

Goa News: चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करा; आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांची मागणी

Goa Assmbly Live: लाटंबार्से औद्योगिक वसाहतीसाठी 38 कोटींचे वीज उपकेंद्र तातडीने उभारा; आमदार चंद्रकांत शेट्ये यांची सरकारकडे मागणी

Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये वाढता रक्तदाब ठरु शकतो जीवघेणा! आई आणि बाळासाठी धोक्याची घंटा; जाणून घ्या 'प्री-एक्लेम्पसिया'ची लक्षणे

SCROLL FOR NEXT