Dhanteras 2022 Date and Timing Dainik Gomabtak
लाइफस्टाइल

Dhanteras 2022 Date and Timing : यंदा धनत्रयोदशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि विधी

Dhanteras 2022 Date and Timing : हिंदू कॅलेंडरनुसार, धनत्रयोदशीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला येतो.

दैनिक गोमन्तक

हिंदू धर्मात दिवाळीला आणि धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. विशेषत: धनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा चांदी विकत घेतल्यास घरामध्ये समृद्धी येते. धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकजण नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करतात. जाणून घेऊया या वर्षी धनत्रयोदशी कधी आहे आणि खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते आहेत.

(Dhanteras 2022 Date and Timing)

धनत्रयोदशी 2022 कधी आहे?

हिंदू कॅलेंडरनुसार, धनत्रयोदशीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला येतो. यावर्षी धनत्रयोदशी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.02 वाजता सुरू होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:44 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे.

खरेदीसाठी शुभ मुहूर्त

धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते आणि शुभ मुहूर्ताची काळजी घेतली तर ती अधिक फलदायी होते. जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करत असाल तर 23 ऑक्टोबरला सूर्योदयापासून संध्याकाळी 6.03 वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे, यावेळेत तुम्ही खरेदी करू शकता.

Dhanteras 2022 Date and Timing

धनत्रयोदशीची पूजा पद्धत

धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. ही पूजा संध्याकाळी केली जाते आणि यावेळी मंदिरात सर्व देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित करून त्यांना अभिषेक केला जातो. त्यानंतर तुपाचा दिवा लावून फुले व फळे अर्पण करावीत. यानंतर कुबेर आणि देवी लक्ष्मीला पांढरी मिठाई अर्पण करावी. धन्वंतरीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT