Reasons & Solutions For White Beard Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Reasons & Solutions For White Beard: कमी वयात दाढीचे केस पांढरे होण्याची 4 कारणं आणि त्यावर सोप्पे उपचार

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे अनेक तरूण चिंतेत असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

whitening of the beard : कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे अनेक तरूण चिंतेत असतात. डोक्यासह दाढीचे केस देखील पांढरे झाल्याने त्यावर काय उपाय करावा याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. डोक्याचे केस पांढरे झाल्यास त्याला डाय लावली जाते, तसेच आता दाढी देखील काळी करण्यासाठी डाय केली जाते. पण, केस पांढरे होण्यामागे काय कारण आहे? दाढीचा रंग कमी वयात का पांढरा होतो? याची माहिती मिळाल्यास त्यावर उपचार करणे सोप्पं जाईल. चला तर मग जाणून घेऊयात कमी वयात दाढीचे केस पांढरे होण्याची 4 कारणं आणि त्यावरचे सोप्पे उपचार.

1) मेलेनिन हा एक असा पिंगमेंट आहे जो डोळे, केस आणि त्वचेचा नैसर्गिक रंग आणि चमक चांगली ठेवण्यासाठी आवश्यक असते. मेलेनिन कमतरतेचा केस, डोळे आणि त्वचेच्या रंगावर परिणाम होतो. यावर उपाय म्हणजे आहारात लिंबूवर्गीय अन्न, बेरी आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात. हे शरीरातील मेलेनिन वाढवण्यासाठी मदत करेल.

2) धुम्रपान, मद्यपान या सारखी व्यसनही कमी वयात दाढी आणि केस पांढरे होण्याचे एक महत्वाचे कारण असू शकते. जास्त धुम्रपान केल्याने रक्तवाहिन्या आकुंचित पावतात, त्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत रक्ताचा प्रवाह नीट होत नाही, त्यामुळे दाढीचा रंग काळा ते पांढरा होऊ लागतो.

3) लहान वयात केस आणि दाढी पांढरे होण्याचे एक कारण अनुवांशिक देखील असू शकते. त्यामुळे, तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक वाढवणे हा एकच पर्याय आहे. तसेच, नियमित व्यायामाचे देखील अनेक फायदे आहेत. या उपायांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

4) याशिवाय, सतत तणावाखाली राहिल्याने देखील दाढीचा रंग पांढरा होऊ शकतो. धावपळीचे आयुष्य आणि सतत भेडसावणाऱ्या विविध समस्या यामुळे शरिरावर परिणाम होत असतात. तसेच, खाण्यापिण्याची निश्चित वेळ नसल्यामुळे शरीराला योग्य विश्रांती किंवा पोषण मिळत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT