Healthy Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dieting Tips: डायटिंगमुळे तुमचे केस गळताय? मग अशी घ्या काळजी

वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करायला लागतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

Puja Bonkile

Dieting Tips: बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामध्ये वाढते वजन ही एक समस्या वाढत चालली आहे. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण डाएटिंग आणि व्यायाम करत असतो. पण वजन कमी करत असताना केस गळतीची समस्या वाढत जाते. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी डाएटींग करतात. त्यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता जाणवते. हे टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

  • डायटिंगमुळे केस गळतात का?

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करतात. वजन कमी झाले की शरीरात अनेक हार्मोनल बदल होऊ लागतात. केस मुळापासून कमकुवत झाल्यामुळे असे होते. याशिवाय केसांना फाटे देखील फुटतात. पुरेशा प्रमाणात प्रथिने, लोह आणि इतर आहारातील फायबर सप्लिमेंट्सच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. यामुळे पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केसांना पोषण मिळत नाही आणि केस गळू लागतात. 

केसांचे आरोग्य निकोगी ठेऊन कसे कराल वजन कमी

प्रथिनांचे पुरेसे सेवन

मासांहार आणि बीन्समध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. प्रथिने केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास करतात. प्रथिने अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. अंडी, पालक, लिंबूवर्गीय फळे, नट, गाजर, एवोकॅडो आणि संपूर्ण धान्य हे निरोगी आहार आहेत. ज्याच्या सेवनाने वजन कमी होऊ शकते आणि केस गळणार नाही.

मर्यादित कॅलरीज्

पुरेशा प्रमाणात कॅलरीज् घेतल्याने शरीराला कार्य करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी, कॅलरी मर्यादित असणे आवश्यक आहे. खूप जास्त कॅलरी कमी केल्याने पौष्टिकतेची कमतरता होते आणि केसांसंबंधित समस्या निर्माण होतात.

व्हिटॅमिन युक्त आहार

केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, आयर्न आणि झिंक हे खूप महत्वाचे आहेत. हे जीवनसत्त्व वजन कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी उपयुक्त मानले जाते. त्यामुळे त्यांचे सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT