Diabetes Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes Diet: मधुमेहींसाठी उडदाची डाळ ठरते वरदान, असा करा आहारात समावेश

उडदाची डाळ स्वादिष्ट असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. ही डाळ मधुमेही फायदेशीर आहे.

Puja Bonkile

निरोगी आरोग्यासाठी कडधान्ये खाणे फायदेशीर आहेत. आरोग्य तज्ञ देखील आपल्या दैनंदिन आहारात प्रथिनेयुक्त डाळींचा समावेश करण्याचा सल्ला देतात. त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जी आरोग्यासाठी आवश्यक असतात. कडधान्ये सुपरफूड म्हणून ओळखली जातात. यामध्ये उडीद, मूग, मसूर, हरभरा यांचा समावश होतो.

आजकाल मधुमेहाची समस्या वाढत आहे. रक्तातील साखर वाढली की अनेक समस्यांचा धोका वाढतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करणे गरजेचे आहे. आहारात काही पदार्थांचा समावेश करून रक्तातील साखरेची पातळी सामान्य करता येते.

  • उडीद डाळ मधुमेहावर गुणकारी

उडीद डाळ चवीला उत्तम असुन आरोग्यासाठीही फायदेशीर असते. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह सारखे पोषक घटक आढळतात. या डाळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे तुमची भूक नियंत्रित ठेवते. तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे. जो रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या आहारात उडीद डाळीचा समावेश करू शकता. ज्यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

खिचडी

ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी खिचडी हा अतिशय उत्तम पर्याय आहे. खिचडी ही विविध प्रकारच्या डाळींपासून बनवली जाते. यासाठी तुम्ही चणा डाळ, मूग डाळ किंवा उडीद डाळ वापरू शकता. त्यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. खिचडी चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही भाज्यांचाही वापर करू शकता.

पराठा

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला काही चविष्ट खायचे असेल तर तुम्ही उडीद डाळीपासून बनवलेला पराठा खाऊ शकता. तुम्ही त्यात मेथीची पानेही मिसळू शकता. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. या दोन्ही गोष्टी वाढत्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

कढी

भात आणि कढी खायला सर्वांनाच आवडते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी उडीद डाळाची कढी पिणे फायदेशीर ठरते. यामध्ये दही आणि इतर मसाले वापरता येतात. उडीद डाळ कढीमध्ये बेसनाचा वापर केला जात नाही. तुम्ही उडीद डाळ कढीचा आस्वाद भात किंवा रोटीसोबत घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT