Avocado Oil For Skin  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes Care : मधुमेहामुळे पायाला येणाऱ्या सूजेवर 'या' 5 तेलांचा रामबाण उतारा; एकदा वापरुन पाहाच

आज आम्ही तुम्हाला अशाच 5 गुणकारी तेलांबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला मधुमेहामुळे सुजलेल्या पायांसाठी फायदेशीर आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Diabetes Care : डायबेटिस किंवा मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. मात्र बहुतांश रुग्ण हे पायाला येणाऱ्या सुजेमुळे त्रस्त असतात. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्याने पायांना सूज येते. ब्लड शुगरचं प्रमाण वाढल्यामुळे रक्तप्रवाह खंडित होतो आणि यामुळे पायांना सूज येण्याचं प्रमाण वाढतं.

सूज आल्यावर पाय लालबुंद होतात, इतकंच नाही तर त्वचाही गरम होते आणि काहीवेळा वेदनाही होतात. सूजलेल्या पायांमुळे चालतानाही त्रास होतो. पायाला आलेली सूज कमी करण्यासाठी काही तेलांचा वापर करणं सहज शक्य आहे. या तेलाच्या मालिशमुळे मांसपेशींना आणि हाडांना आराम मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 गुणकारी तेलांबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला मधुमेहामुळे सुजलेल्या पायांसाठी फायदेशीर आहेत.

बदामाचं तेल

पायांना आलेली सूज आणि वेदना दूर करण्यासाठी बदामाचं तेल खूप फायदेशीर आहे. बदामाचं तेल व्हिटामिन ई ने युक्त असतं. काही लोकांना पायाची सूज घालवण्यामध्ये खोबरेल तेलही फायद्याचं ठरतं. वेदना शमवण्याची ताकद या तेलामध्ये असते. खोबरेल तेलामध्ये लॉरिक अॅसिडचं प्रमाण भरपूर असतं. या तेलाच्या वापराने पायाची सूज, वेदना, सांधेदुखी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

तिळाचं तेल

पायाला आलेली सूज दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाची मालिश फारच फायदेशीर ठरते. तिळाच्या तेलाच्या वापराने हाडं मजबूत होतात. तिळेल तेलामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, कॉपर, झिंक, प्रोटिन, कॅल्शियम, मॅग्नेशिअम यासारखे पोषक तत्वं असतात. या तेलाच्या नियमित वापरामुळे पायाची सूज कमी होते.

मोहरीचं तेल

पायाला आलेली सूज आणि दुखणं दूर करण्यासाठी मोहरीचं तेल फारच गुणकारी आहे. तेलाला थोडं कोमट करुन रात्री झोपण्यापूर्वी सूज आलेल्या जागी मालिश केल्यास आराम मिळतो. या तेलाचा दिवसातून 1 ते 2 वेळा वापर करण्याचा सल्ला वैद्यांकडून दिला जातो. मोहरीचं तेल वेदनाशामक असल्यामुळे दुखण्यासह सूजही कमी करण्यास मदत करतं.

इसेन्शिअल ऑईल

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पायाची सूज कमी करण्यासाठी इसेन्शिअल ऑईलचा वापर करता येतो. यात अर्धी बादली गरम पाण्यात 2-3 प्रकारच्या तेलाचे थेंब टाकावे. युकेलिप्टस ऑईल, पेपरमिंट ऑईल, आणि लिंबाच्या तेलाचे 3-4 थेंब पाण्यात टाकून पाय 15 मिनिटं गरम पाण्यात शेकून घ्यावेत. यानंतर टॉवेलच्या साहाय्याने पाय पुसुन घ्यावेत. पायाची सूज कमी होण्यास हा पर्याय खूप फायदेशीर ठरतो.

ऑलिव्ह ऑईल

पायाला सूज आली असता त्याचं दुखणं कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फार फायदेशीर आहे. तेल थोडंसं गरम करुन पायाला मालिश केल्याने सूज, जखडलेले सांधे यासारख्या गोष्टींपासून आराम मिळतो. नसांमध्ये रक्तप्रवाह सुरळित करण्यासाठी तेलाची मालिश फायदेशीर ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT