Depression in Children Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Depression in Children: मोबाईलमुळे वाढतोय लहान मुलांमध्ये नैराश्य अन् एकटेपणा; मग अशी घ्या काळजी

लहान मुलांमध्ये नैराश्य आणि एकटपणाचे समस्या वाढत आहे. ही समस्या कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Depression in Children: बदलत्या लाइफस्टाइलमुळे खूप लहान मुलं एकटेपणा आणि नैराश्याचे बळी ठरत आहेत. लहान मुलांमध्ये एकटेपणा आणि नैराश्य या समस्या वाढत चालली आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की 90 टक्के मुलांना एकटेपणा जाणवतो. अहवालानुसार, 84 टक्के मुलांनी स्वत:ला मोबाईलमध्ये व्यस्त ठेवले आहे. यामुळे पालकांसबोत किंवा इतर मित्रांसोबत बोलणे कमी झाले आहे.

  • एकटेपणा टाळण्यासाठी मुलं मोबाईलचा वापरतात

एकटेपणा टाळण्यासाठी मुलं मोबाईलचा वापर करतात, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. आई-वडिल आपल्याला वेळ देत नाही या भावनेपासून दूर राहण्यासाठी स्वत:ला मोबाईलमध्ये व्यस्त ठेवातात. परिणामी कंपनीचे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी हेड गीताज चन्ना यांनी आवाहन केले आहे की, दरवर्षी एक दिवस मोबाईल फोन बंद ठेवण्याची मोहीम राबवावी. यावर्षी 20 डिसेंबर रोजी एक तास मोबाईल बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुलांची कशी काळजी घ्याल

  • बाल मानसशास्त्रज्ञाच्या मते मुलांना कधीही एकटे सोडू नका. त्यांच्या हातात मोबाईल देऊन कोणतेही काम करणे टाळावे. याएवजी लहान मुलांना काम करतांना गोष्टी सांगाव्य. तसेच इतर गोष्टीमध्ये त्यांना गुंतवून ठेवावे.

  • मुलांना मैदानी खेळात व्यस्त ठेवावे. त्यांच्यासोबत खेळावे तसेच त्यांना चांगल्या संगतीत ठेवा. यामुळे त्यांना नैराश्य येणार नाही.

  • मोबाईल फोन आणि टीव्ही दोन्ही मुलांच्या आरोग्यासाठी घातक असते. त्यांना सर्व डिवाईसपासून दूर ठेवावे, त्यांना या गोष्टी शक्य तितक्या कमी वापरायला द्यावी.

  • मुलांनासमाजात कसे वावरावे हे शिकवावे. त्यांना पार्कमध्ये घेऊन जा आणि त्यांना मिळून-मिसळून राहायला शिकवावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

SCROLL FOR NEXT