Weight Gain Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Gain Tips: वजन वाढत नसल्याने त्रस्त आहात? 'हा' पदार्थ करेल मदत

Weight Gain Tips: लोह कमी होणे, केस गळणे, सतत मूड बदलणे, वजन वाढणे, कमी ऊर्जा, थायरॉईड अशा समस्यांपासूनदेखील मुक्तता मिळू शकते.

दैनिक गोमन्तक

Weight Gain Tips: आपल्यापैकी अनेकजण वाढत्या वजनाने त्रस्त असतात. त्याचप्रकारे अनेकजण कमी वजनामुळेदेखील काहीजण त्रस्त असतात.

कितीही अन्न खाल्ले, बाजारात मिळणारे प्रोटीनचे सेवन केले तरीही त्यांचे वजन आहे तेवढेच राहते. अशा लोकांसाठी आणखी दोन पदार्थांचे सेवन कऱणे गरजेचे आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेकजण तूप आणि खजूर असे वेगवेगळे बऱ्याचदा खात असतील मात्र तूप आणि खजूर एकत्र खाल्ले तर वजन वाढण्यात मदत होऊ शकते.

कसे करावे सेवन?

रात्री पाण्यात खजूर भिजू घालावेत. सकाळी त्यातील बिया काढून त्यात दोन चमचे तूप घालावे आणि त्याचे सेवन करावे. यामुळे ज्यांचे वजन कमी आहे त्यांना वजन वाढवण्यात मदत होईल.

वजन वाढवण्याबरोबरच याचे आणखी काही फायदे आहेत. लोह कमी होणे, केस गळणे, सतत मूड बदलणे, वजन वाढणे, कमी ऊर्जा, थायरॉईड अशा समस्यांपासूनदेखील मुक्तता मिळू शकते.

कधी खाऊ शकता?

ज्या लोकांमध्ये पित्त प्रकृती आहे, म्हणजेच जे लोक कमी उर्जा, अॅसिडिटी, केस गळणे, केस पांढरे होणे या समस्यांचा सामना करत आहेत, ते सकाळी ते खाऊ शकतात.

कफ प्रकृतीचे लोक दुपारी, जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर घेऊ शकतात.

वात प्रकृतीचे लोक संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान घेऊ शकतात. खजूर आणि तुपाची ही खास रेसिपी यावेळी खाल्ल्यास केस गळणे, वजन कमी होणे आणि कमी ऊर्जा या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

ज्या लोकांना कोणतीही समस्या नाही ते सकाळी नाश्त्यापूर्वी किंवा संध्याकाळी सेवन करु शकतात. याबरोबरच, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT