crispy corn recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Crispy Corn Recipe: पावसाळ्यात घरीच घ्या क्रिस्पी कॉर्नचा आस्वाद, लगेच नोट करा रेसिपी

पावसाळ्यात तुम्ही हॉटेलसारख्या क्रिस्पी कॉर्नचा घरीच आस्वाद घेऊ शकता.

Puja Bonkile

Crispy Corn Recipe: सर्वत्र सध्या पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळा म्हटले की मका खाण्याची एक मज्जाच वेगळी असते. पण जर तुम्हाला हॉटेलसारखे क्रिस्पी कॉर्न खायचे असेल तर घरीच बनवू शकता. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. खायला देखील चवदार आहे. चला तर मग जाणून घेऊया क्रिस्पी कॉर्न कसे बनवावे.

  • क्रिस्पी कॉर्न बनवण्यासाठी लागणारे साहित्य

स्वीट कॉर्न- 2 कप

कॉर्न फ्लोअर-1/4 कप

तांदळाचे पीठ- 2 चमचे

काळी मिरी- 1/2 टीस्पून

लाल तिखट-1/2 टीस्पून

आमचुर पावडर- 1/2 टीस्पून

लिंबाचा रस-1 टेबलस्पून

वनस्पती तेल- 1 कप

मीठ

sweet corn
  • क्रिस्पी कॉर्न बनवण्याची कृती

सर्वात पहिले एका भांड्यात मका घ्यावा. नंतर ते पाण्यात टाकून उकळावे.

नंतर जास्तीचे पाणी काढून घ्यावे.

नंतर एका भाड्यांत मका आणि तांदळाचे पाठ मिक्स करून मिक्स करावे.

नंतर मीठ आणि काळी मिरी घालावे. चांगले मिक्स करावे.

कढईत तेल गरम करावे. कोटेड केलेले मका दाणे कुरकुरीत आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळावे.

तळलेले कॉर्न एका भांड्यात ठेवा. त्यात तिखट, आमचुर पावडर, मीठ आणि लिंबाचा रस घालावा.

नंतर चवीनुसार मीठ घालावे.

तुमचा स्वादिष्ट क्रिस्पी कॉर्न आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA मध्ये 3 ते 4% वाढीचे संकेत, अधिकृत घोषणा कधी होणार? मोठी अपडेट समोर

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT