Corona New Jn1 Variant Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Corona New Jn1 Variant: नवीन वर्षाच्या आनंदावर कोरोनाचं सावट! अशी घ्या काळजी...

नव्या वर्षांचे आनंदात स्वागत करायचे असेल तर कोरोना संबंधित काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Corona New Jn1 Variant: जगभरात कोरोनाचा उपप्रकार JN.1 चा हा धोका वाढला आहे. कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता नव वर्षाचे स्वागत करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय सर्दी, खोकला,ताप सारख्या श्वसनाच्या आजाराचा धोकाही हिवाळ्यात जास्त असतो. या सर्व कारणांमुळे काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

कुटुंबातील सदस्यांसह बाहेर गेल्यावर हे आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. श्वसनाचे हे आजार टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • मास्क वापरावा

घरा बाहेर पडताना मास्क वापरा. कारण हवेत सर्दी-खोकल्याचे व्हायरस आणि बॅक्टेरिया हवेत पसरले असतात. मास्क लावल्याने केवळ या सूक्ष्मजंतूंपासूनच नव्हे तर प्रदूषणापासूनही संरक्षण करू शकतात.

  • स्वच्छता

श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांपासून दूर राहायचे असेल तर शारिरिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. कोणताही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुवावे. तसेच डोळ्यांना किंवा चेहऱ्याला थेट हात लावणे टाळावे. बाहेरून आल्यावर सर्वात पहिले हात आणि पाय स्वच्छ धुवावे. तसेच सॅनिटायझरचा वापर करावा.

  • रोगप्रतिकारश्ती वाढवावी

कमकुवत रोगप्रतिकारशक्तीमुळे सामान्य सर्दी, खोकला आणि तापसारख्या आजाराला तुम्ही सहज बळी पडू शकता. म्हणूनच तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करावा. आहारात हिरव्या भाज्या, फळं, दूध, कडधान्यांचा समावेश करा. हे तुमच्या शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वे प्रदान करेल, जे शरीर निरोगी बनवण्यासाठी आवश्यक आहेत.

  • हायड्रेटेड राहावे

पाण्याची कमतरता हे अनेक रोगांचे मूळ आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. पाण्याच्या कमतरतेमुळे पोटासंबंधित, त्वचेसंबंधित अनेक आजार निर्माण होऊ शकतात. यामुळे शरीरात पाण्याची पातली संतुलित ठेवावी. यासाठी नारळ पाणी, ताज्या फळांचा रस यांचे सेवन करावे.

  • व्यायाम करावा

व्यायामामुळे तुमची आरोग्य निरोगी राहते. एरोबिक व्यायाम तुम्हाला यामध्ये विशेषतः मदत करू शकतात. यामुळे तुमची फुफ्फुस निरोगी राहते आणि त्यांची काम करण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे रोज काही वेळ व्यायाम करा. योगासन करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे प्राणायाम, कपालभारती यासारखे योगप्रकार करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT