आयुर्वेदिक काढा  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती

(Health Tips) घरच्या घरी आणि घरी असलेल्या साहित्याच्या मदतीने आपण काढा तयार करू शकतो

दैनिक गोमन्तक

करोना (Corona) या साथीच्या रोगाने सर्वांना प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचे महत्त्व जाणवले आहे. औषधे (Medicine) आणि जीवनशैलींचे (Lifestyle) सतत निरीक्षण करण्याबरोबरच जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे समृध्द पौष्टिक आहार घेणे आणि शरीराला मदत करण्यासाठी हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे (Important) आहे.

एखाद्याला ताप, शरीर दुखणे, वास आणि चव कमी झाल्यावर भूक न लागणे सामान्य आहे. परंतु आता करोनाच्या काळात या गोष्टींकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. करोना झाला म्हणून घाबरून न जाता योग्य ती काळजी घेणे जरुरीचे आहे. किंवा करोना संसर्गाला बळी पडूनये या करीता, व्यवस्थित आहार ठेवणे, व्यायाम करणे, दैनंदिन प्राणायाम करणे या गोष्टी वेळेवर करून रोगप्रतिकार शक्ति वाढवणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करता यावा यासाठी आयुर्वेद आणि घरगुती उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण देशामध्ये सध्या कोरोना रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवु शकतो. विशेष म्हणजे घरच्या घरी आणि घरी असलेल्या साहित्याच्या मदतीने आपण काढा तयार करू शकतो. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

काढा करण्याची पद्धत:

साहित्य :

  • तुळशीचे पाने

  • दालचिनी

  • सुंठ

  • काळे मिरे

  • खडीसाखर

  • जेष्टमध काडी

पद्धत:1

हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 4 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून घ्या. ताप किंवा सर्दी असेल तर तुम्ही हा काढा दिवसातून चार वेळा घेऊ शकतात.याचा आरोग्यासाठी आपल्या फायदा होईल.

पद्धत:2

साहित्य :

सुंठ - 1 चिमुट

तुळशीची पाने - 4

दालचीनी -1 छोटा तुकडा

काळी मिरे- 2

खडीसाखर - छोटा तुकडा

कृती:

सर्व साहित्य घ्या आणि 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या पाणी थोड अटल्यानंतर गाळून प्या.

टीप:

जर तुम्हाला डायबेटीज किंवा बी. पी असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. यामुळे यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. काढ्यात जास्ती-जास्त मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. बऱ्याचदा अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. यामुळे तुम्हाला तोटा काही होणार नाही कारण मसाले हे दैनंदिन जीवनात पण वापरले जातात शिवाय ते आयुर्वेदिक आहे. परंतु याचे योग्य प्रमाण जाणून घेतले पाहिजे तरच त्याचा फायदा तुम्हाला होईल. पण गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पती घेताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. याच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT