Restaurants in Goa| Copperleaf | Goa
Restaurants in Goa| Copperleaf | Goa Instagram
लाइफस्टाइल

Restaurants in Goa: जुन्या नव्याचा संगम 'कॉपरलीफ' रेस्टॉरंट

Manaswini Prabhune-Nayak

सतत वर्दळ असलेला पर्वरीचा चोगम रस्ता कळंगुट-बागाकडे जाणाऱ्या पर्यटकांनी फुललेला असतो. पूर्वीचा आणि आताचा चोगम रस्ता यात बऱ्यापैकी बदल जाणवतो. अलीकडच्या काळात पर्वरी भागही खूप बदलला आहे. हे एक उपनगर म्हणून विकसित झालं असून पूर्वी कधी बघितली नाहीत इतकी वेगवेगळी रेस्टोरंन्टस या भागात दिसू लागली आहेत. यातली सर्वात महत्वाची रेस्टोरंट याच चोगम रस्त्यावरच आहेत. काही दिवसात 'फूड स्ट्रीट' सारखं स्वरूप या रस्त्याला येऊ शकतं. इथे सर्वप्रकारच्या रेस्टोरंन्टचे पर्याय आहेत. चांगले शाकाहारी, उत्तम मांसाहारी, बिर्याणी-कबाब, मासळी खायची असेल तर ताजी मासळी मिळू शकेल, असे रेस्टोरंट देखील आहेत. याच रस्त्यावर चुकवता येणार नाही असं आणि अगदी थोड्याच कालावधीत ज्याने आपलं नाव एखाद्या ब्रँडप्रमाणे विकसित केलं आहे ते 'कॉपरलीफ मल्टीकुझीन रेस्टोरंट' आज अनेकांच्या तोंडी असतं. (Copperleaf Restaurants in Goa news)

कॉपरलीफच नाव झालं ते इथे मिळणाऱ्या 'फिश थाळी'मुळे. कॉपरलीफ जेव्हा सुरू झालं तेव्हा लोकांनी मोठ्या उत्सुकतेनं इथली 'फिश थाळी' खाण्यासाठी गर्दी केली होती. पर्यटक गोव्यात (Goa) येतात ते एकदा तरी फिश थाळीची चव घेतल्याशिवाय परत जात नाहीत. गोव्यात येऊन इथली मासळी खाल्ली नाही म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल बघितला नाही, असंच झालं ना. शिवाय स्थानिक चवीने खाणारे गोयंकार आहेतच. ते तर जास्त चिकित्सक. पर्यटकांना कदाचित इथली एकदम अस्सल चव कळणार नाही, मासळी (Fish) ताजी आहे कि नाही हेदेखील कळणार नाही. पण स्थानिक खवय्या लोकांना सहजासहजी फसवता येत नाही. 'कॉपरलीफ'ला हे समीकरण अगदी समजलं आहे, त्यामुळे अस्सल गोमंतकीय मसाल्यांची चव, ताजी मासळी, पारंपरिक पदार्थ या सगळ्यामुळे आज 'कॉपरलीफ'चं नाव झालं आहे.

सचिन पै बीर हे कॉपरलीफचे मालक आहेत. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन त्यांनी रेस्टोरन्टच्या व्यवसायात आपलं नशीब आजमावलं याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. त्यांची एक मुलाखत मी नुकतीच वाचली होती. त्यात त्यांना स्वाभाविकपणे हाच प्रश्न विचारण्यात आला होता की, इंजिनिअर असून तुम्ही या क्षेत्रात कसे? यावर त्यांनी छान उत्तर दिलं. ते म्हणाले, गोव्यात वेगवेगळ्या प्रकारची रेस्टोरंट्स आहेत. त्यात उत्तम जेवण देणारे परंतु अतिशय वाईट सर्व्हिस मिळणारे असं तरी रेस्टोरंट असतं किंवा दुसरे अतिशय उत्तम सर्व्हिस मिळते पण तेवढं चांगलं जेवण मिळत नाही, असंही असतं. एक परिपूर्ण 'पॅकेज' कसं असू शकतं, याचा मी गांभीर्याने विचार करत होतो. याच विचारातून 'कॉपरलीफ'ची निर्मिती झाली. चांगलं अन्न, ग्राहक केंद्रित सेवा, उत्तम आरामदायी वातावरण, यातून ग्राहकाला आनंद आणि समाधान दोन्ही मिळतं. आपल्या कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण घालवायला, आवडीचं जेवायला आल्यावर तो चार जास्त पैसे खर्च करायला तयार असतो. मग त्याला चांगलं जेवण आणि चांगली सेवा मिळायलाच हवी.

सचिन पै बीर हे युवा उद्योजक आहेत ज्यांनी आपल्या व्यवसायाला आपल्या अभ्यासाची जोड दिली आणि अल्पावधीत 'कॉपरलीफ'चं नाव केलं. कोरोनातील लॉकडाऊनचा अत्यंत खडतर असा काळ देखील अनुभवला. पर्वरीतील कॉपरलीफ अतिशय यशस्वीपणे सुरु असताना त्यांनी याची पणजीत दुसरी शाखा सुरु करायचं ठरवलं. पणजीत कॉपरलीफ सुरू होण्याच्या तयारीत असताना 'लॉकडाऊन' गोष्टीत झाला. दोन वर्ष सगळं थांबलं. पण आता ही सगळी मरगळ झटकून परत नव्या जोमाने आणि मोठ्या दिमाखात पणजीत कॉपरलीफ सुरु झालं आहे.

कॉपरलीफ हे भारतीय पदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे त्यांच्याकडे तसे नावाजलेले शेफ आहेत. एक बंगाली शेफ इथे असल्यामुळे त्यांनी मुद्दाम काही बंगाली पदार्थांचा समावेश आपल्या मेनू कार्डवर केला आहे. दुर्गापूजेच्या काळात मुद्दाम बंगाली पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी बंगाली समाजातील लोक इथे जेवायला येतात. सचिन पै बीर यांना खवय्या लोकांची नाडी चांगली समजली आहे आणि म्हणूनच ते या व्यवसायात करत असलेल्या प्रयोगात यशस्वी होत आहेत. ते म्हणतात 'माझी स्पर्धा माझ्याशीच आहे'. स्वतःच्या नफ्यापेक्षा ग्राहकांचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे हे त्यांनी तत्त्व सांभाळल्यामुळे आज कॉपरलीफ लोकांच्या पसंतीस उतरतंय.

काय काय मिळते ?

हे हॉटेल गोवन, भारतीय, चायनीज, थाई, भारतीय पदार्थांमध्ये देखील बंगाली पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. तरीदेखील इथली 'फिश थाळी' ही प्रसिद्ध आहे. रेस्टोरंट मध्ये येणाऱ्या ग्राहकाला आपली थाळी निवडता येतील असे वेगवेगळे पर्याय कॉपरलीफमध्ये उपलब्ध आहेत. फिश थाळीचे वेगवेगळे पर्याय आहेत. स्पेशल थाळी, नॉर्मल थाळी, किंगफिश थाळी आणि चणक थाळी. स्पेशल थाळी मध्ये - सुंगटाचं हुमण आणि भात, त्या दिवशी जी ताजी ताजी मासळी असेल ती मासळी तळून दिली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT