Cooking Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Tips: भाजी चवदार होण्यासाठी ट्राय करा बिना कांद्या-लसूणची ग्रेव्ही

चला तर मग जाणून घेवूया ग्रेव्ही (Gravy) बनवण्याच्या खास तीन पद्धती.

दैनिक गोमन्तक

आपण जेव्हा भाजी बनवतो, तेव्हा ती भाजी चवदार होण्यासाठी ग्रेव्ही (Gravy) महत्वाची आहे. भारतीय पाककृतीमध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी अनेक पद्धती (Methods) वापरल्या जातात. पण काही भाज्या या ग्रेव्हीशिवाय सुद्धा चवदार (Tasty) होतात तर काही भाज्या ग्रेव्हीशिवाय तयारच होऊ शकत नाही. म्हणून चला तर मग जाणून घेवूया ग्रेव्ही (Gravy) बनवण्याच्या खास तीन पद्धती.

* कांदा आणि लसूणचा वापर न करता

सध्या श्रावण महिना सुरू आहे. अनेक लोक या महिन्यात कांदा आणि लसूण खाणे टाळतात. कांदा आणि लसूण न वापरता सुद्धा चवदार भाजी तयार करता येते. यासाठी नारळ, खसखस आलं, हिरवी मिरची, शेंगदाणे, टोमॅटो यांचे चांगले मिश्रण तयार करून घ्यावे. नंतर यात थोडे पनीर टाकून बारीक पेस्ट तयार करावी. हि तयार पेस्ट तुम्ही कणत्याही भाजीमध्ये वापरू शकता. हि ग्रेव्ही भाजीची चव वाढवते. तसेच भाताबरोबर अप्रतिम चव लागते.

* टोमॅटो ग्रेवी

भाजीमध्ये टोमॅटो ग्रेव्हीचा वापर केल्याने भाजीची चव अनेक पटीने वाढते. हि ग्रेव्ही प्रत्येकांच्या घरात तयार केली जाते. हि ग्रेवी तयार करण्यासाठी दोन टोमॅटो, चवीसाठी साखर, दही, कस्तूरी मेथी यांची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यावी. नंतर यात लाल तिखट, धणे पावड, गरम मसाला आणि हळद मिक्स करून चांगल्या प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्या. ग्रेव्ही घट्ट येण्यासाठी थोडे ब्रेड पावडर मिक्स करावे. हि ग्रेवी तुम्ही कोणतीही भाजीमध्ये वापरल्यास भाजीची चव दहापट वाढेल. हि ग्रेव्ही बनवण्याची पद्धत नक्की घरी ट्राय करा.

* काजू आणि खसखसची ग्रेवी

मटार मशरूम आणि पनीर मशरूमची भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. हि भाजी तयार करण्यासाठी तुम्ही काजू आणि खसखसची ग्रेव्ही वापरू शकता. हि ग्रेव्ही तयार करण्यासाठी काजू, खसखस, वेलची दाणे, आलं, लसूण आणि टोमॅटो यांची पेस्ट तयार करावी. नंतर यात जिरे, लाल तिखट आणि हिंग टाकून तडका द्यावा. शेवटी तुम्ही यात दही देखील मिक्स करू शकता. या ग्रेव्हीमध्ये नेहमी गरम पाणी घालावे. या ग्रेव्हीमुळे तुमच्या भाजीची चव अधिक वाढेल. हि ग्रेव्ही एकदा नक्की करून पाहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT