Soft Dough Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Soft Dough: या पद्धतीने कणिक मळल्यास चपाती बनेल सॉफ्ट

पीठ जितके जास्त मळले तितकी चपाती सॉफ्ट बनते.

Puja Bonkile

Soft Dough: अनेक लोकांना मऊ चपाती खायला आवडते. यामुळे जेवणाची चव वाढते. अनेक लोकांना सकाळी आणि रात्रीच्या जेवणात चपाती बनवल्या जातात.

पण अनेक प्रयत्न करून देखील चपाती सॉफ्ट होत नाही. याचे दोन कारण असू शकतात. पहिले गव्हाचा दर्जा आणि पाठ व्यवस्थित न मळणे.

जर तुम्हाला पीठ मळायची योग्य पद्धत माहित नसेल तर चपाती सॉफ्ट होणार नाही. पीठ जितके चांगले मळले तितके चांगले असते. चला तर मग जाणून घेऊया पीठ मळताना कोणती काळजी घ्यावी.

  • सॉफ्ट पीठ मळण्यासाठी लागणारे साहित्य

पीठ - 1 मोठी वाटी

तेल-1/2 चमच

मीठ- 1/4

पाणी- गरजेनुसार

  • कृती

सर्वात पहिले पीठ मळून घेण्यासाठी एका मोठ्या परातमध्ये पीठ चाळून घ्यावे. नंतर पीठात आश्यकतेनुसार मीठ घालावे. नंतर आवश्यकतेनुसार पाणी आणि तेल घालुन चांगले मळावे. पीठामध्ये मीठ टाकल्याने चपातीची चव वाढते. पीठ चांगले मळल्यानंतर मुठीने पीठ दाबून घ्यावे.असे सुमारे पाच मिनिटं करावे. नंतर झाकून ठेवावे. परत वरून पीठाला तेल लावून २ ते ३ मिनिट मळावे. अशा प्रकारे सॉफ्ट चपात्या बनवण्यासाठी योग्य पीठ तयार करावे.

Chapati

चपाती खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पचनसंस्था सुरळित कार्य करते

चपातीचा आहारात समावेश करणे पचनासाठी फायदेशीर ठरते. कारण यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. तसेच बध्दकोष्ठतेचा समस्या कमी करण्यासाठी चपातीचा आहारात समावेश करावा.

  • फायबरचा चांगला स्त्रोत

चपाती खाल्याने पोट लवकर भरते. तसेच ज्या लोकांना फायबरची कमतरता असते त्यांनी चपातीचा आहारात समावेश करावा.

  • अशक्तपणा कमी होते

चपातीमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. यामुळे अशक्तपणाची समस्या दूर होते. यामुळे सकाळी आहारात चपातीचा समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT