Remedies for Constipation Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Constipation: बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नसेल तर सकाळी 'या' ड्रायफ्रूट्सचे करावे सेवन

जर तुम्हाला रोज सकाळी पोट साफ न होण्याचा त्रास हेत असेल तर ही बातमी नक्की वाचा

दैनिक गोमन्तक

Constipation: अनेक लोकांना पोटाच्या समस्या असतात. पण काही लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. दररोज त्यांना पोट साफ करण्यासाठी धडपड करावी लागते. अशावेळी त्यांना काही गोष्टी न खाण्याचा सल्ला त्या लोकांना दिला जातो.

या समस्येला सामोरे जाण्यासाठी अनेक घरगुती उपाय करता येणार. रोज सकाळी गरम पाणी पिण्यापासून बडीशेपच्या पाण्यापर्यंत यामुळे जर बद्धकोष्ठता दूर होऊ शकत नसेल तर ही ड्रायफ्रूट्स भिजवून खाऊ शकता. यामुळे तुमच्या बद्धकोष्ठतेत आराम मिळेल.

दररोज पोट साफ न करण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास बद्धकोष्ठता तीव्र होते. ज्यामुळे मूळव्याधाची भीती असते. मूळव्याध खूप वेदनादायक असतात. ज्यामध्ये मलत्याग करताना रक्तस्त्राव आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवते. या सर्व समस्या टाळण्यासाठी दररोज पोट स्वच्छ ठेवणे आणि बद्धकोष्ठता त्वरित दूर करणे आवश्यक आहे.

  • भिजवलेले अंजीर

दररोज रात्री कोरडे अंजीर भिजवा. सकाळी हे अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. भिजवलेल्या अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे पोटाची घाण काढून टाकण्यास मदत करते. इतकंच नाही तर अंजीर खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. आपण कोणत्याही प्रकारचे अनहेल्दी फूड देखील टाळू शकता. अंजीरचा स्वभाव उष्ण असल्याने उन्हाळ्यात फक्त दोन ते तीन अंजीर भिजवून खावे. याचे जास्त प्रमाण पोटाची पचनसंस्था देखील खराब करू शकते.

  • भिजवलेले बदाम

रात्री भिजवून सकाळी बदाम खाल्ल्याने बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळतो. उन्हाळ्यात (Summer) हे खाणे अधिक फायदेशीर आहे कारण ते पोटाला देखील थंड करते. व्हिटॅमिन के, सी, ए तसेच मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने भरपूर प्रून खूप फायदेशीर आहेत.

बदाम खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसोबतच शरीराच्या इतर समस्यांमध्येही आराम मिळतो. वजन कमी (Weight Loss) करण्यासोबतच कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य ठेवण्यासही प्रून्स मदत करतात.

  • भिजवलेले काळे मनुके

डोळ्यांची (Eyes) दृष्टी वाढवण्यासोबतच काळ्या मनुका एनीमियाचा आजार दूर करण्यासही मदत करतात. काळे मनुके रात्री भिजवून सकाळी खाल्ल्यानेही बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते जे मल मऊ आणि सहज जाण्यास मदत करते.

पाइल्सची करणे

- बद्धकोष्ठतेमुळे पाइल्स होऊ शकतात. बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नाही. यामुळे आतड्यावर झोर द्यावा लागतो. यामुळे सुद्धा पाइल्सची (Piles) समस्या निर्माण होऊ शकते.

- तसेच जे लोक दीर्घकाळ उभे राहून काम करतात त्यांनाही पाइल्सची (Piles) समस्या होऊ शकते.

- लठ्ठपणा देखील पाइल्सचा (Piles) त्रास होण्याचा एक महत्वाचे कारण आहे.

- तसेच अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान पाइल्सचा त्रास होऊ शकतो.

- तर अनेक महिलांना प्रसूतीनंतर ही समस्या निर्माण होऊ शकते.

- जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा त्रास असेल तर तुम्हाला सुद्धा हा त्रास होऊ शकतो.

पाइल्सची लक्षणे

- शौचानंतर रक्तस्त्राव होणे

- गुदद्वारा भोवती सूज येणे.

- गुदद्वाराजवळ खाज सुटणे.

- शौचानंतर सुद्धा असे वाटणे की पोट साफ झाले नाही.

- पाइल्समधून फक्त रक्त येणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT