Urine & Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Urine & Health: लघवीचा रंग सांगेल तुमच्या आरोग्याची माहिती; दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा

लघवीचा रंग तुमच्या खाण्याच्या सवयी आणि आरोग्याविषयी बरेच काही सांगून जातो.

गोमन्तक डिजिटल टीम

लघवी हा आपल्या शरीरातील असा एक घटक आहे ज्याबद्दल आपण उघडपणे बोलत नाही किंवा बोलण्यास संकोच करतो. पण लघवीचा रंग तुमच्या खाण्याच्या सवयी आणि आरोग्याविषयी बरेच काही सांगून जातो.

तुम्हाला एखाद्या आजाराची किंवा आरोग्याबाबत काही संकेत मिळतात पण त्यातून आपल्याला काही उमजत नाही. परंतु तुमच्या लघवीचा रंग काही प्रमाणात ते संकेत देऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही काळजी घेऊन, वेळेत वैद्यकीय मदत घेऊ शकता.

जोपर्यंत तुमच्या लघवीचा रंग पिवळा आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण जेव्हा त्याचा रंग बदलतो तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण यापेक्षाही बरेच काही आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

लघवीचा रंग आणि लक्षणे

मूत्राचा सामान्य रंग पिवळा ते गडद पिवळा असतो.

- लाल रंगाच्या लघवीकडे कधीही दुर्लक्ष करू नये कारण ते मूत्राशय किंवा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे पहिले लक्षण असू शकते. तसेच किडनी स्टोन आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन देखील असू शकतात.

- लघवी गुलाबी किंवा केशरी रंग काही खाद्यपदार्थ जसे की बीटरूट किंवा अन्नातील काही रंगांमुळे किंवा रिफॅम्पिसिन आणि पायरीडियम सारख्या औषधांमुळे होऊ शकतो.

- लघवी साफ होणे म्हणजे जास्त हायड्रेशन, याचा अर्थ तुम्ही जास्त पाणी पीत आहात असा होतो.

- फिक्या रंगाची लघवी हे डिहायड्रेशन, लघवीचा संसर्ग किंवा एखाद्या व्यक्तीची लघवी खूप वेळ रोखून धरल्याने असे लक्षण दिसू शकते.

- लघवीचा गडद तपकिरी रंग काही औषधांमुळे किंवा यकृताच्या आजारामुळे असू शकतो.

- लघवीचा रंग निळा आणि हिरवा फार दुर्मिळ स्थितीत असतो. दुर्मिळ प्रकारच्या मूत्रमार्गाच्या संसर्गामध्ये किंवा काही शस्त्रक्रियांनंतर अशी लक्षणे दिसतात.

डॉक्टरांचा सल्ला घ्या!

दरम्यान, कोणत्याही प्रकारात तुम्हाला त्रास झाल्यास किंवा अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT