Coffee Side Effects  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Coffee Side Effects: उन्हाळ्यातही कॉफी पित असाल तर वेळीच थांबा; हे दुष्परिणाम घ्या जाणून

खास करून उन्हाळ्यात कॉफी पिणे टाळा.

दैनिक गोमन्तक

Side Effects of Drinking Coffee in Summer: अनेकजण सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर एक कप कॉफी घेतात. सकाळी उठल्यावर कॉफीचा कप हातात घेणे तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवू शकते.

यावेळी तुमच्या शरीरात कोर्टिसोलची पातळी पहिल्यापेक्षा अधिक होते. कॉफीचे सेवन केल्यानंतर स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. खास करून उन्हाळ्यात कॉफी पिणे टाळा.

योग्य प्रमाणात कॉफीचं सेवन शरीरासाठी चांगलं आहे. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट ठरतो.

कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढून अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळेल.

रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोन म्हणजेच स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. यामुळे स्त्रियांच्या प्रजननाच्या क्षमतेवर वजन आणि हार्मोन्सवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी सकाळी जास्त आणि संध्याकाळी कमी असते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही सकाळी सर्वात आधी कॅफिनचे सेवन करता तेव्हा कोर्टिसोलची पातळी कमी होते.

दिवसातून किती कप कॉफी योग्य आहे?

एका दिवसात 400 ग्रॅम किंवा त्याहून कमी कॅफिनचे सेवन केले पाहिजे. अनेकदा लोक दिवसभरात अनेक कप कॉफी, चॉकलेट किंवा इतर कॅफिनयुक्त गोष्टी खातात, ज्यामुळे शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत ही सवय तुम्हाला अनेक रोगांचे कारण बनवू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT