Coconut Water Side Effects Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Coconut Water Side Effects: तुम्हीही दररोज नारळ पाणी पिता...?

नारळ पाणी पिणे ही आरोग्यासाठी फायदेशीर असते.

दैनिक गोमन्तक

नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आजारी व्यक्तींना याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या चवदार नैसर्गिक पेयामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स वाढवण्यासोबतच अनेक फायदे देखील देतात.

काही लोक चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी दररोज याचे सेवन करतात. तसे तर या हेल्दी ड्रिंकचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की रोज नारळ पाणी प्यायल्याने आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर ही बातमी पुर्ण वाचा.

नारळ पाणी (Coconut Water) पिणे ही चांगली सवय आहे, असे अनेकांना वाटते. पण ही सवय धोकादायकही ठरू शकते हे त्यांना माहीत नसते. जेव्हा तुम्ही रोज नारळ पाणी पिता तेव्हा ते शरीरातील काही घटकांचे प्रमाण अनेक पटीने वाढवते, जे हानिकारक ठरतात. त्यामुळे पोटॅशियमची पातळी वाढते, ज्यामुळे पोटात अस्वस्थता आणि इतर समस्या उद्भवू शकतात. 

coconut water
  • नारळ पाणी पिण्याचे वाईट परिणाम

कमी रक्तदाब

नारळाच्या पाण्यामुळे 'लो ब्लडप्रेशर' होऊ शकते. कारण त्यात पोटॅशियम खूप चांगल्या प्रमाणात आढळते. यामुळेच ते रोज प्यायल्याने अचानक रक्तदाब कमी होतो. असे झाले तर ते तुमच्या आरोग्यासाठी (Health) अजिबात योग्य आहे असे सिद्ध होणार नाही. 

पोटाचे विकार

नारळाच्या पाण्याचे जास्त सेवन केल्याने लूज मोशन देखील होते. कारण त्यात किण्वन करण्यायोग्य ऑलिगोसॅकराइड्स, डिसॅकराइड्स, मोनोसॅकराइड्स आणि पॉलीओल्स (FODMAPs) असतात. यामुळे शॉर्ट चेन कार्बोहायड्रेट असतात. ते आतड्यांमधून पाणी काढण्याचे काम करतात. यामुळे लोकांमध्ये डायरियासारख्या पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

health care

मधुमेह  

मधुमेह असलेल्या लोकांसाठी नारळ पाणी हानिकारक ठरू शकते.  त्यात असलेली उच्च कॅलरी आणि साखरेची पातळी मधुमेहाची समस्या वाढवू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेची वाढ खूप वेगाने होते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच नारळ पाण्याचे सेवन करा. 

इलेक्ट्रोलाइट असंतुलन

नारळाच्या पाण्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅंगनीजसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात. बाजारात विकल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या नारळाच्या पाण्यात त्याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.  ते दररोज प्यायल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होते, जे धोकादायक देखील ठरू शकते. उदाहरणार्थ, पोटॅशियम पातळी वाढल्याने पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT