Cleaning Tips: पूजेच्या टेबलवर कपाड पसरल्यानंतरच देवाची मूर्ती आणि फोटो ठेवावा असे सांगितले जाते. पुजा करतांना कापजावर अनेकदा डाग पडतात. हे डाग हट्टी व चिकट असल्याने लवकर निघत नाहीत. यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.
तुप आणि तेलाचे डाग
कपड्यांवर तेल किंवा तूप पडले तर लगेच त्यावर टिश्यू पेपर ठेवावा. हे सर्व तेल शोषून घेईल. नंतर उरलेले डाग काढण्यासाठी, एका भांड्यात बेकिंग सोडा आणि डिश लिक्विडची पेस्ट तयार करावे आणि कापडावर लावावे. 3 मिनिटांनंतर, कापड थंड पाण्याने धुवावे.
फुलांचे डाग कसे काढाल
पुजेच्या टेबलावर फुले जास्त वेळ ठेवल्यास कपड्यांवर डाग पडतो. अशावेळी ते काढण्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून त्यावर लावावे. 5 मिनिटे राहू द्यावे आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावे.
चंदनाचे डाग कसे काढाल
कपड्यांवरील चंदनचे डाग काढण्यासाठी सर्वात पहिले व्हिनेगर, पाणी आणि लिक्विड डिटर्जंट समान प्रमाणात मिक्स करून मिश्रण तयार करावे. नंतर डाग असलेला कापडाचा भाग भिजवून 10-15 मिनिटे राहू द्यावे. नंतर सामान्य पाण्याने धुवावे आणि कोरडे करावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.