Clapping Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Clapping Benefits: सकाळी जोरात टाळ्या वाजवल्यास दुर होतील 'हे' आजार

तुम्हाला माहीत आहे का टाळ्या वाजवल्याने तुम्हाला किती फायदे होतात.

दैनिक गोमन्तक

कुठलाही आनंदाचा प्रसंग आला तर टाळ्या वाजवतो. भजन कीर्तन करतांना देखील टाळ्या वाजवल्या जातात, वाढदिवसाच्या कार्यक्रमातही टाळ्या वाजवल्या जातात. पण फिटनेससाठी टाळ्या वाजवणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहितीय का? हे तुम्हाला विनोदी वाटेल पण हे खरे आहे की टाळ्या वाजवून तुम्ही शरीरापासून अनेक आजार दूर ठेवू शकता. या प्रक्रियेला क्लॅपिंग थेरपी म्हणतात. याचे फायदे जाणून घेऊया.

  • हृदय निरोगी ठेवा

टाळ्या वाजवून तुम्ही तुमचे हृदय (Heart) निरोगी ठेवू शकता, प्रत्यक्षात तुमच्या हातात 29 एक्यूप्रेशर पॉईंट्स आहेत, टाळ्या वाजवल्याने त्या सर्वांवर दबाव येतो ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि यामुळे हृदय निरोगी राहते.

  • मानसिक आरोग्य सुधारा

तणाव (Stress) आणि नैराश्यातही टाळ्या वाजवणे खूप चांगले मानले जाते. सकाळी नियमितपणे टाळ्या वाजवण्याचा सराव करावा.असे केल्याने तुमच्या मेंदूला सकारात्मक संकेत मिळतात. जे तणाव कमी करते आणि तुमचे मन शांत करते, आनंदी हार्मोन्स वाढवते. ज्यामुळे तुम्हाला आराम वाटतो.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवा

दररोज सकाळी 20 ते 30 मिनिटे क्लॅपिंग थेरपी केल्याने तुमची प्रतिकारशक्ती (Immunity) वाढण्यास मदत होते. टाळ्या वाजवल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा चक्र सक्रिय होते.टाळी वाजवल्याने शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढतात आणि तुमची प्रतिकारशक्तीही वाढते.

  • त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेसाठी (Skin) विशेषतः फायदेशीर मानले जाते. टाळ्या वाजवल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते, त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाहही चांगला राहतो, त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते.

  • टाळ्या वाजवण्याची योग्य पद्धत कोणती?

हाताला मोहरी किंवा खोबरेल तेल लावा. टाळ्या वाजवतांना अशा प्रकारे वाजवा की तळहाताचे टोक आणि बोटे एकमेकांना स्पर्श करतील. असे सकाळी करणे अधिक फायदेशीर असते. दिवसातून 1500 वेळा टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही रोज जेवल्यानंतरही टाळ्या वाजवू शकता. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT