Smartphone Addiction In Kids Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Smartphone: मुलांमध्ये वाढतोय 'या' 3 आजारांचा धोका, कारण ठरतंय 'स्मार्टफोनचे व्यसन; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Smartphone Addiction In Kids: मोबाईलचे हे व्यसन मुलांना मानसिक, शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या कमकुवत करत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः त्याच्याशी संबंधित 3 आजारांचा धोका वेगाने वाढत आहे.

Manish Jadhav

आजच्या डिजिटल युगात मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. एकीकडे हे उपकरण ज्ञान, मनोरंजन आणि संपर्क टिकवून ठेवण्याचे साधन आहे, तर दुसरीकडे, मुलांमध्ये त्याचे वाढते व्यसन चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणामुळे मुले स्क्रीनशी जोडली गेली. मात्र आता परिस्थिती अशी बनली की, अभ्यास संपल्यानंतरही मुले तासनतास मोबाईलशी चिकटलेली पाहायला मिळतात.

मोबाईलचे हे व्यसन मुलांना मानसिक, शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या कमकुवत करत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः त्याच्याशी संबंधित 3 आजारांचा धोका वेगाने वाढत आहे. बंगळुरुमध्ये झालेल्या एका संशोधनातून असे दिसून आले की, फोनच्या वापरामुळे 60 टक्के मुलांची झोप उडत आहे. चला तर मग या संशोधनाबाबत सविस्तर जाणून घेऊया...

तज्ञ काय सांगतायेत?

द क्युरियस पॅरेंटचे संस्थापक हरप्रीत सिंग ग्रोव्हर सांगतात, इतरांकडे असलेला फोन पाहून मुले फोनची मागणी करु लागतात. याचा अर्थ असा की मुले त्यांच्या मित्रांकडे फोन पाहतात आणि नंतर त्यांच्या पालकांकडून फोनची मागणी करतात. फोनच्या व्यसनावर बंगळुरुमध्ये केलेल्या एका संशोधनानुसार, 28 टक्के मुले फोनच्या व्यसनाने ग्रस्त आहेत. दररोज 5 तासांपेक्षा जास्त वेळ फोनवर घालवणाऱ्या 60 टक्के मुलांना निद्रानाशाचा त्रास होतो. त्याचवेळी, 20 टक्के मुलांची दृष्टी कमकुवत होत चालली आहे. त्यांना कमी वयातच चष्मा लागत आहे.

या ३ आजारांचा धोका

1. झोपेची समस्या

संशोधनानुसार, फोनच्या अतिवापरामुळे 60 टक्के मुलांना झोपेच्या समस्येने ग्रस्त आहेत. रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ पाहणे, गेम खेळणे किंवा सोशल मीडियावर (Social Media) रिल पाहणे यामुळे त्यांच्या झोपेच्या वेळेवर परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये चिडचिड, लक्ष केंद्रित न होणे आणि थकवा जाणवतो.

2. डोळ्यांची समस्या

सतत स्क्रीनकडे पाहिल्याने मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो. यामध्ये डोळ्यांमध्ये जळजळ, अंधुक दृष्टी, डोकेदुखी आणि कोरडेपणा यांचा समावेश आहे. फोनच्या अतिवापरामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते. संशोधनानुसार, 20 टक्के मुलांना लहान वयातच चष्मा वापरावा लागत आहे. या मुलांना डोकेदुखीचाही सामना करावा लागत आहे.

3. मानसिक आरोग्यावर परिणाम

दरम्यान, फोनच्या व्यसनाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. सतत सोशल मीडियावर अपडेट राहणे, ऑनलाइन गेम खेळणे आणि व्हिडिओ कंटेंट पाहिल्याने मुले तणाव, चिंता आणि नैराश्याचे शिकार बनत चालले आहेत. तसेच, रियल जगापासून दूर जाणे मुलांसाठी घातक बनत चालले आहे. संशोधनानुसार, 20 टक्के मुलांना फोनचे व्यसन जडले आहे.

मुले त्यांच्या फोनवर काय पाहत आहेत?

अभ्यासाच्या नावाखाली फोन मागणारी मुले प्रत्यक्षात मोबाईलवर काहीतरी वेगळेच करत असतात. काही आकडेवारीतून हे उघड झाले आहे. जसे-

37 टक्के मुले व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर (यूट्यूब, नेटफ्लिक्स) तासन्तास घालवतात.

35 टक्के मुले सोशल मीडियावर (इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप) सक्रिय असतात.

33 टक्के मुले ऑनलाइन गेममध्ये (PUBG, फ्री फायर) गुंतलेली आहेत.

मुलांच्या जीवनशैलीतील 'या' बदलांकडे दुर्लक्ष करु नका

मूल अचानक गप्प बसते.

झोप, खाणे किंवा इतर सवयींमध्ये बदल.

नेहमी फोनवर असणे.

शाळा किंवा अभ्यासापासून अंतर ठेवणे.

पालकांशी बोलणे थांबवणे.

पेरेटिंग टिप्स

16 वर्षांखालील मुलांना फोन देऊ नका.

दररोज 15 मिनिटे मुलांसोबत बसून गप्पा मारा.

मुलाची प्रत्येक मागणी पूर्ण करु नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, मलेशियाचा 4-1 नं केला पराभव

Dharbandora Accident: धारबांदोड्यात दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जखमी

GST 2.0: दूध, औषधं, शालेय साहित्य, विमा... 'या' सेवा आणि वस्तूंवर आता 0% जीएसटी, पाहा संपूर्ण यादी

BITS Pilani: नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू; बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी

ODI World Cup 2025: एकदिवसीय विश्वचषक तोंडावर असताना टीम इंडियाला तगडा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

SCROLL FOR NEXT