Chikal Kalo Festival Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chikal Kalo Festival: गोव्यातील ‘चिखल काला’ उत्सवाचं रोगप्रतिकारक शक्तीशी आहे कनेक्शन?

Ganeshprasad Gogate

Chikal Kalo Goa Mud Festival Significance

आषाढी द्वादशीला गोव्यातील माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानमध्ये वार्षिक ‘चिखल काला’ उत्सव करण्यात येतो. दरवर्षी देवकीकृष्ण देवस्थानच्या मैदानावर तीन दिवस ‘चिखल काला’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

कार्यक्रमासाठी भव्य मंडपाची बांधणी करण्यात  आली. सदर कार्यक्रम श्री देवकीकृष्ण संस्थान तसेच माशेलातील भाविकांतर्फे साजरा करण्यात येतो. या सणाचं आयुर्वेद आणि निसर्गोपचारातील महत्त्व जाणून घेऊया...

‘चिखल कालो’ म्हणजे चिखलाचा काला (पातळ मिश्रण) करुन ते अंगाला फासले जाते. त्यामुळेच ‘चिखल काला’ या सणाला आयुर्वेदिक दृष्ट्या बरेच महत्व असल्याचे वैद्य सुविनय दामले यांनी सांगितले.

“अंगाला जेव्हा माती लागते तेव्हा मातीतील काही बॅक्टेरिया जे माणसाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात असे त्वचेला लागल्यावर ते अंगात भिनतात आणि त्या बॅक्टेरियांचे अँटी डोस तयार होतात. यालाच मृदा लेपन असेही म्हणतात.”
सुविनय दामले

विशेष म्हणजे ही उपचारपद्धती गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असल्याचे उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये गर्भ संस्कारात गर्भिणीला पाचव्या महिन्यात ‘’चौराहे की धूल’’ हा संस्कार केला जातो. 

या प्रकारात चार रस्ते ज्याठिकाणी एकत्र येतात ती जागेवरची माती तिच्या अंगाला लावली जाते. तिच्या कमरेला बांधली जाते. अशाने तिच्या शरीरात अँटीबॅडिज तयार होतात.

(आत्ता आधुनिक काळात जी लसीकरण पद्धती केली जाते त्यात त्याच रोगाचे जंतू अर्धमेले करून माणसाच्या शरीरात सोडले जातात.) थोडक्यात शरीरात अँटीबॅडिज तयार करणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हाच या मागचा उद्देश आहे, असंही वैद्य दामले यांनी स्पष्ट केलंय.

निसर्गातील घटकांद्वारे आजार बरा करण्याच्या पद्धतीला निसर्गोपचार पद्धती म्हणतात. निसर्गोपचार पद्धती ही एक पर्यायी उपचार पद्धती आहे. हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश या द्वारा रुग्णावर उपचार केले जातात. जल चिकित्सा, मृदा चिकित्सा असे प्रकार निसर्गोपचार पद्धतीत सांगितले आहेत.

निसर्गोपचारातील मृदा चिकित्सेत काही आजारांमध्ये मातीचा लेप लावून आजार कमी करण्याचा प्रकार केला जातो. त्यामुळेच निसर्गोपचार पद्धतीनुसार चिखलकालो ही उपचार पद्धती महत्वाची आहे.
- सरिता कांबळी

चिखल कालाविषयी

चिखल काला हा देवकीकृष्ण देवस्थानचा पारंपरिक सण आहे. आषाढी एकादशीला देवकीकृष्ण मंदिरातील भजनी सप्ताहाची सांगता चिखल काला खेळून केली जाते. भजन संपल्यानंतर चिखलात खेळण्यापूर्वी आसपासचे लोक खेळणाऱ्यांना तेल लावतात, ‘गोपाळ गडी या रे’ असे म्हणत सर्व लोक एकत्र येऊन विठ्ठलाचा गजर करीत मंदिराला प्रदक्षिणा घालतात. 

यातील खेळ प्रकार:-

या सणात पारंपरिक क्रीडा खेळले जातात. जसे की,बेडुक उडय़ा, चेंडू फेक, चक्र, आंधळी कोशिंबीर अशा विविध पारंपरिक खेळ प्रकारांचा त्यात समावेश असतो.

या खेळांद्वारे शारीरिक हालचाली होऊन आपसूकच व्यायाम घडतो. आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढते.  

चिखल काल्याची सांगता दहीहंडीने:-

साधारणपणे दोन तास चाललेल्या या चिखल काल्याची सांगता दही हंडीने होते. दही हंडी फोडल्यानंतर आंघोळ करून नंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात आरत्या गाऱ्हाणे व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT