Chaitra Navratri 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chaitra Navratri 2023: नवरात्रीत कांदा-लसूणाविना बनवा 'हे' 3 प्रकारचे सात्विक रायता

तुम्ही घरच्या घरी उत्तम आणि आरोग्यदायी असे 3 रायत्याच्या रेसिपी ट्राय करू शकता.

दैनिक गोमन्तक

Chaitra Navratri 2023 Special Recipes: चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली असून या काळात अनेकजण माता देवीला प्रसन्न करण्यसाठी उपवास करत असतात. या काळात खाण्यापिण्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होउ शकते.

या काळात आपण आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे जे शरीराला वेळोवेळी रिहायड्रेट ठेवते. आपले पोट थंड ठेवण्यासाठी विविध पेयांचा समावेश करावा. या दरम्यान तुम्ही कांदा आणि लसूणशिवाय या गोष्टींनी बनवलेल्या रायत्याचे सेवन करू शकता.

  • काकडीचा रायता

काकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. या रायताचे सेवन केल्यास नवरात्रीच्या काळात उष्णता आणि पाण्याची कमतरता जाावणार नाही. यासोबतच हा रायता पोटाला थंडावा आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवतो.

म्हणून उपवासाच्या वेळी रोज 1 वाटी दही घ्या, नंतर त्यात किसलेली काकडी घाला. वरून थोडी काळी मिरी आणि जिरे परतून घ्या आणि बारीक झाल्यावर मिक्स करा. हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून मिक्स करा रायता तयार आहे.

  • दुधी भापळ्याचा रायता

दुधी भापळ्याचा रायता उपवासाच्या वेळी बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यास मदत करू शकते. पोटाला हायड्रेट करण्यासोबतच या रायत्याचे सेवन केल्यास शरीरातील इतर अवयवांचे कार्य जलद होण्यास मदत होते.

तसेच, हे पोट आणि आतड्यांसंबंधी हालचालींच्या चयापचय गतीला गती देते. यामुळे तुम्ही उपवास दरम्यान बद्धकोष्ठतेपासून दूर राहू शकता. म्हणून, दुधी भोळ्याचा तुकडा कापून उकळवा. गार झाल्यावर मॅश करून त्यात दही आणि मीठ टाकून सेवन करावे.

  • पालक रायता

पालक खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हा रायता शरीराला ऊर्जा देण्याचे काम करू शकते. हा रायता खाल्ल्याने शरीर आणि मेंदूला ऊर्जा मिळते आणि शरीर दिवसभर आरामात काम करू शकते.

त्यामुळे पालक धुवून 2 ते 3 शिट्ट्या करुन घ्यावे. त्यानंतर ते मॅश करा आणि नंतर त्यात रॉक मीठ आणि दही घालावे. हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर चिरून मिक्स करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT