आजकाल सर्वांकडे कार आहे. यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे सोयीस्कर झाले आहे. अनेक लोक कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसवतात किंवा जास्त सामान ठेवतात. परंतु असे केल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
गैरसोय होते
गाडीत जास्त सामान भरल्याने अनेक गैरसोयी होतात. उदाहरणार्थ, जर गाडीत जास्त प्रवासी बसले तर प्रवास करणे कठीण होते आणि गाडी चालवणे देखील कठीण होते. तसेच जास्त सामान ठेवल्यास देखील समस्या उद्भवू शकतात.
इंजिन आणि सस्पेंशन
कारमध्ये जास्त लोक बसल्यामुळे सस्पेशनवर दबाव वाढतो. त्यामुळे सस्पेशन बिघडण्याचा किंवा तुटण्याचा धोका असतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहनात जास्त सामान ठेवणे किंवा जास्त लोक बसणे याचा थेट परिणाम इंजिनवर होतो. कार ओव्हरलोड केल्याने त्याचे इंजिन खराब होऊ शकते.
बॉडीत होऊ शकते डॅमेज
कारच्या क्षमतेपेक्षा जास्त सामान किंवा माणसे भरली गेली तर त्याचा परिणाम बॉडीवर होतो. कारमध्ये बसवलेले चेसिस केवळ मर्यादित वजन वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. अशावेळी त्यावर जास्त भार पडल्यास नुकसान होण्याची शक्यता वाढते.
टायर खराब होणे
कोणत्याही कारसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची चाके आणि कोणत्याही कारमध्ये जास्त सामान ठेवले किंवा कारच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवले तर टायर खराब होऊ शकतात. ओव्हरलोडिंगमुळे टायर लवकर खराब होतात. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.