Car Tire Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Tire Tips: पावसाळ्यात कारच्या टायरची घ्या अशी काळजी, वाढेल टायर्सची लाइफ

कारचे टायर्स हे कारचा असा पार्ट आहेत जो नेहमी रस्त्याच्या संपर्कात असतो. यामुळे पावसाळ्यात टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Monsoon Car Tips: अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून उन्हापासून दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात आरोग्यासह वाहनांची काळजी घेणे देखील गरजेचे असते. वाहनांचे टायर हा पार्ट रस्त्याच्या जास्त संपर्कात येतो. यामुळे टायर्सची काळजी घेणे गरजेचे असते. प्रवास सुखकर होण्यासाठी वाहनांच्या टायर्सची काळजी घेणे गरजेचे असते.

  • डेप्थ तपासावी

जोपर्यंत टायरमध्ये बनवलेल्या चरांमध्ये डेप्थ नाही, तोपर्यंत तणाव नाही. परंतु जर तुमच्या गाडीचा टायर घासल्यानंतर गुळगुळीत झाला असेल आणि त्यात बनवलेले चर संपले असतील, तर अशावेळी पावसाळ्यात तुमचे वाहन घसरण्याचा धोका वाढतो. यामुळे टायरची काळजी घ्यावी.

  • टायरला किती वर्ष झाले

पावसाळ्यात गाडीचे जुने टायर बदलणे गरजेचे आहे. टायर्स 10 वर्ष टिकु शकतात. प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पावसाळ्यात गाडीचे टायर चेक करणे फायदेशीर ठरेल

  • सुरक्षित अंतर ठेवा 

पावसाळ्यात वाहन चालवतांना वेग कमी ठेवावा. तसेच सुरक्षित अंतर ठेवून गाडी चालवणे सहानपणाचे असेल. कारण कोणत्याही कठिण परिस्थितीत गाडीवर नियंत्रण ठेवता येते.

  • पावसाळ्यात रस्ता पाहून गाडी चालवावी  

पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचते. अशावेळी रस्त्यावर गाडी जास्त स्पीडने चालवणे टाळावे. तसेच पावसाळ्यात रस्ता निसरडा होतो. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील टायरची पकड मजबूत ठेवण्यासाठी पावसाळ्यात वाहनाचा वेग कमी ठेवणे फायद्याचे राहील.अन्यथा अपगात होण्याची शक्यता असते.

  • क्रूझ कंट्रोल वापरू नका

रस्त्याच्या पृष्ठभागावरील पाण्याचे प्रमाण पावसाप्रमाणे नेहमीच बदलत असते. त्यामुळे रस्ता ओला असताना क्रूझ कंट्रोल बंद करणे चांगले. हे वाहन एका निश्चित गतीने चालवते. अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सिस्टीम देखील फक्त रहदारीच्या परिस्थितीला प्रतिसाद देतात.  त्यामुळे वाहनावर हाताने नियंत्रण ठेवणे चांगले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT