Winter Car Care Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Car Care Tips: हिवाळ्यात कारची 'अशी' काळजी घेतल्यास येणार नाही कोणतीही अडचण

हिवाळ्यात कारने फिरायला जाण्यापुर्वी कारची तपासणी करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Winter Car Care Tips: प्रत्येक प्रकारच्या हवामानात विशेषतः हिवाळ्यात कारची काळजी घेणे खूप गरजेचे असते. तसे न केल्यास कारमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमची ट्रिपची मज्जा देखील खराब होऊ शकते. यामुळे कारच्या कोणत्या बागाची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

ब्रेक

थंडीच्या दिवसांमध्ये गाडीच्या ब्रेककडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ब्रेकमध्ये बिघाड झाल्यास वाहन थांबवणे आणि अपघात टाळणे कठीण होऊन बसते. हिवाळ्यात कमी तापमानामुळे काहीवेळा ब्रेक नीट लावण्यात अडचण येते. त्यामुळे हिवाळ्यात कारने फिरायला जाण्यापुर्वी ब्रेकची काळजी घ्यायला हवी.

रबर

थंडीच्या दिवसांमध्ये कारमधील रबर खराब होण्याचा धोकाही वाढतो . कंपनीकडून दारे, डिक्की आणि बोनेटजवळ रबर बसवले जाते. परंतु कमी तापमानामुळे रबर खराब होऊन फुटण्याचा धोका वाढतो. असे झाल्यावर गाडीत पाणी येणे, हवा येणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात.

पेट्रोल

कार चालवण्यासाठी पेट्रोलची गरज असते. पण थंडीच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी तापमान कमी असताना पेट्रोल घट्ट होऊ लागते. त्यामुळे कार चालवणे अवघड होऊन बसते, तर कधी गाडी सुरू करणेही कठीण होते. त्यामुळे हिवाळ्यात मोकळ्या जागेत कार पार्क न करणे टाळावे. तसेच कारवर कव्हर टाकावी.

वायपर

हिवाळ्यात कारच्या वायपरची काळजी घेणे आवश्यक असते. कार चालवताना विंडशील्डवर दव जमा होऊ लागते. याशिवाय, कधीकधी आत आणि बाहेरील तापमानामुळे विंडशील्डवर धुके देखील दिसतात. हे काढून टाकण्यासाठी, वायपरने योग्यरित्या कार्य करणे फार महत्वाचे आहे. तसे न झाल्यास दृश्यमानता कमी होऊन अपघाताचा धोकाही वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कामुर्लीच्या उपसरपंच्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

IFFI 2024: मराठी कलाकारांची 'शोलेला' मानवंदना! अभिनेत्री प्राजक्ता दातारने म्हणला Iconic Dialogue; ‘बसंती, इन कुत्तों के सामने..'

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

SCROLL FOR NEXT