Car Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Cleaning Tips: कारच्या इंटेरिअरची अशी घ्या काळजी; छानही दिसेल अन् खर्चही वाचेल! वाचा सोप्या टिप्स

कार आतून स्वच्छ ​करणे सोपे काम नाही, म्हणून सहसा यासाठी कार वॉश सर्विसची मदत घेतली जाते. पण हे काम तुम्ही स्वतःही करू शकता.

Puja Bonkile

Car Cleaning Tips: कारच्या आत स्वच्छता राखणे कधीकधी एक आव्हानात्मक काम बनते, परंतु योग्य साधने आणि तंत्राने ते अगदी सहजपणे करणे शक्य आहे. लक्षात ठेवा की नियमित आणि योग्य साफसफाईमुळे तुमची कार जास्त काळ नवीन दिसते. त्यामुळे त्याचे आयुर्मानही वाढते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासोबत कारचे आतील भाग स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगत आहोत.

  • स्टीम क्लीनरचा वापर

गाडीचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्टीम क्लिनरची मदत घेऊ शकता. त्याची उच्च-दाब असलेली वाफ कार्पेट्स, सीट आणि विविध पृष्ठभागांवरील घाण आणि धुळ एकाच वेळी काढून टाकते .

  • लिंट रोलर

आजकाल अनेक लोक पाळीव प्राण्यासोबत कारमध्ये प्रवास करत असतात. त्याचे केस कारमध्ये इकडे तिकडे पडलेले असतात. अशावेळी ते स्वच्छ करण्यासाठी लिंट रोलर वापरू शकता. यामुळे पाळीव प्राण्याचे कोणतेही केस तुम्हाला कारमध्ये दिसणार नाही.

  • व्हॅक्यूम क्लिनर

पोर्टेबल व्हॅक्यूम क्लिनर तुमच्या कारच्या कार्पेट आणि कव्हर्समधील घाण काढण्यास मदत करते. जर तुम्हाला कार आतून स्वच्छ करायची असेल तर तुम्ही घरीच व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करून कार स्वच्छ करू शकता. ज्या ठिकाणी जास्त कचरा असेल त्या ठिकाणी विशेष लक्ष द्या.

  • बेकिंग सोडा

बेकिंग सोडाचा वापर अनेक प्रकारे केला जातो. बेकिंग सेड्याचा वापर करून डाग आणि दुर्गंधी दूर करता येते. तसेच याचा वापर कार आतून स्वच्छ करण्यसाठी केला जातो. यासाठी बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करावी आणि कारच्या आतील सीट कव्हरवर लावावी. मऊ कापड ओले करू स्वच्छ पुसून टाकावे. यामुळे तुमची कार नव्यासारखी चमकेल.

  • व्हिनेगर

व्हिनेगरचा वापर करून तुम्ही कारच्या खिडक्या स्वच्छ करू शकता. कारच्या खिडक्या स्वच्छ करणे कठीण काम आहे. त्यामुळे व्हिनेगर वापरणे खूप फायदेशीर आहे. यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिक्स करावे. नंतर खिडक्यांवर शिंपडावे आणि वर्तमानपत्र किंवा सॉफ्ट कापडाने स्वच्छ पुसावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT