car mileage  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Mileage Tips: जुनी कार खूपच इंधन खातेय? 'या' सोप्या टिप्सने वाढवता येईल मायलेज

अनेक लोक कारचा मायलेज कमी असल्याची तक्रार करतात.जर तुम्हाला कारचा मायलेज वाढवायचा असेल तर या गोष्टींची काळजी घेऊ शकता.

Puja Bonkile

अनके कार चांगला मायलेज देऊ शकत नाही. यामुळे कार लवकर खराब होऊ शकते. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास कारचा मायलेज वाढवू शकता.

  • गाडीमध्ये जास्तीचे वजन ठेऊ नका

अनेक गाड्यांमध्ये गरज नसलेल्या वस्तु ठेवलेल्या दिसतात. अशा वस्तू कारमधून काढल्या पाहिजेत. अनावश्यक सामान गाडीचे वजन वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे मायलेज कमी होते. त्यामुळे गाडीत कमीत कमी सामान ठेवा.

  • टायरची काळजी घ्यावी

बाहेर जाण्यापुर्वी टायर प्रेशर तपासावे. गाडीचे मायलेज चांगले हवे असेल तर गाडीच्या टायरमध्ये प्रमाणात हवा ठेवावी. तसेच नायट्रोजन हवा टायरचे आयुष्य वाढवते.

  • गाडी चालण्याची योग्य पद्धत

गाडी योग्य पद्धतीने चालवल्यास मायलेज देखील चांगला देते. अनेक वेळा लोक कारचा अॅक्सिलरेटर आणि ब्रेक एकदम लावताना. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. यामुळे वाहनाच्या इंजिनवर वाईट परिणाम होतोच, पण मायलेजही कमी होते. यामुळे गाडी चालवतांना योग्य पद्धतीने चालवावी.

  • योग्य ठिकाणी इंधन भरावे

आजकाल बहुतांश पेट्रोल पंपांवर भेसळयुक्त इंधनाची विक्री होत आहे. म्हणूनच अशा ठिकाणाहून पेट्रोल भरा जेथे भेसळ होण्याची शक्यता कमी आहे. कारण इंधन योग्य असेल तर मायलेजही चांगले मिळेल.

  • सर्व्हिसिंग वेळेवर करावी

तुमच्या गाडीला चांगला मायलेज देण्यासाठी त्याची योग्य वेळी सर्व्हिसिंग करून घेणेही महत्त्वाचे आहे. अनेकवेळा लोक दुर्लक्ष करतात. ठाराविक अंतर पुर्ण केल्यानंतर कारची सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT