Sleep

 

Dainik Gomantak 

लाइफस्टाइल

रात्री झोप लागत नाही? 'या' चुका टाळा

तज्ञ सांगतात की, विस्कळीत, हलकी किंवा कमी झोप (Sleep) कार्यक्षमतेवर, पचनावर परिणाम करू शकते.

दैनिक गोमन्तक

दिवसभर ताजे तवाने राहण्यासाठी रात्री शांत झोपेची गरज असते. मात्र चांगली झोप ही अनेकांसाठी स्वप्नच राहते. सर्वांनाच चांगली झोप मिळावी, अशी इच्छा असते. मात्र, काहीजण नकळतपणे दिवसाच्या उत्तरार्धात काही सामान्य चुका करतात ज्यामुळे त्यांची प्रिय झोप चुकते.

तज्ञ सांगतात की, विस्कळीत, हलकी किंवा कमी झोप (Sleep) कार्यक्षमतेवर, पचनावर परिणाम करू शकते. कमी झोपेमुळे लोक अधिक चिंताग्रस्त व अस्वस्थ होऊ शकतात. फक्त झोपेची गुणवत्ता सुधारून आपण अनेक दीर्घकालीन आरोग्य समस्या दूर करू शकतो.

काही चुका ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो

1. मोबाईल व संगणकाचा वापर: अनेक लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा (Mobile) वापर करतात. आयुर्वेद तज्ञ म्हणतात, "झोपण्याच्या 1 तास आधी गॅझेट वापरणे टाळणे चांगले आहे जे तुमचे मन आराम करण्यास आणि दिवसभर अथक काम केल्यानंतर शांत होण्यास मदत करते,"

2. कॉफी व चहा: तज्ञांच्या नुसार, रात्री कॉफी (Coffee)चहा (Tea) पिल्याने झोप लागण्यास त्रास होऊ शकतो. या मध्ये कॅफिन असते, ज्यामुळे व्यक्तीची झोप जाते.

3. सूर्यास्तानंतर जड व्यायाम: संध्याकाळची वेळ ही विश्रांती आणि आराम करण्याची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळी जोरदार व्यायाम (Exercise) केल्याने निद्रानाश आणि इतर झोपेच्या समस्या उद्भवू शकतात कारण व्यायामामुळे आपल्याला जागरुक आणि उत्साही वाटते. अधिक ऊर्जा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपल्याला अधिक सक्रिय बनवते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

4. सूर्यप्रकाश: सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात गेल्याने किंवा संध्याकाळी नैसर्गिक प्रकाशात राहिल्याने रात्री चांगली झोप लागण्यास मदत करते, असे तज्ञ सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT