Mata Lakshami - Kuber Dainik Gomantak
लाइफस्टाइल

माता लक्ष्मी अन् भगवान कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी घरी आणा 'या' 5 गोष्टी

धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांना प्रसन्न केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील.

Puja Bonkile

जर तुम्ही आर्थिक समस्यांना सामोरे जात असाल तर वास्तुशास्त्रात सांगितलेले काही उपाय करू शकता. धनाची देवी माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांना प्रसन्न केल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल आणि तुमच्यावर पैशांचा पाऊस पडू लागेल. चला तर मग जाणून घेऊया काय करावे.

  • कळस

घरात कळस ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. कळस पाण्याने भरून ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. त्यानंतर त्यात तांब्याचे नाणे आणि नारळाची पाने टाकून तोंड झाकून ठेवावे.

  • चांदीची नाणी

माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या छाप असलेली नाणी घरी आणल्याने प्रगतीचा मार्गही खुला होतो. तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत अशी तीन नाणी ठेऊ शकता. यामुळे नशिबाची साथ मिळते आणि व्यक्तीला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

  • माशांचा फोटो

घरात माशाची मूर्ती आणि फोटो देखील खूप शुभ मानले जाते. जीवनात सुख-समृद्धीसाठी तुम्ही चांदीच्या माशाची मूर्ती तुमच्या घरात आणू शकता. घरात फिश पेंटिंग लावणे देखील फायदेशीर आहे.

  • कौडी

पांढऱ्या कौड्या घरात आणल्याने आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा होतो. हे लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून घराच्या तिजोरीत ठेवावे. असे केल्याने पैशासंबंधित समस्या कमी होतील.

  • लक्ष्मी, कुबेर आणि गणपतीचा फोटो

घरामध्ये लक्ष्मी, कुबेर आणि गणेशाची मूर्तीची असणे शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या कृपेने धनाची कमतरता भासत नाही. विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशाच्या कृपेने सर्व कार्य यशस्वी होईल. मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची रोज पूजा करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

CM Pramod Sawant: 'आमच्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री...', राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री सावंतांचं वक्तव्य

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

धूम्रपान करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! स्लिप डिस्कचा वाढला धोका, संशोधनातून धक्कादायक खुलासा; जाणून घ्या लक्षणे आणि तज्ञांचा सल्ला

ऐन चतुर्थीच्या तोंडावर असोला नारळ महागला, लोकांमध्ये चिंता; Watch Video

SCROLL FOR NEXT