Ganpati Bappa morya Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Budhwaar Tips: आजच्या दिवशी करा 'हे' काम, मिळेल आदर अन् सन्मान

बुधवार हा दिवस गणपतीला समर्पित असून तुम्ही या दिवशी काही खास काम केल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

Puja Bonkile

Budhwaar Tips: बुधवार हा दिवस गणपतीला समर्पित आहे. या दिवशी बाप्पाची पुजा करणे शुभ मानले जाते. जर तुमच्या आयुष्यात दुःख आणि संकट असतील तर बुधवारी विघ्नहर्ता गणपती बाप्पाची पुजा करावी.  जर तुमचा बुध कमजोर असेल तर बुधवार हा दिवस मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. बुध ग्रहाला बळ देण्यासाठी बुधवारी गणपतीचे पुढील उपाय केल्यास तुम्हाला लाभ मिळेल आणि आयुष्यात प्रगती होईल.

बुधवारी गायीला खायला द्या 'ही' खास गोष्ट


बुधवारी गायीला हिरव्या रंगाच्या भाज्या खायला द्याव्यात. हिरव्या भाज्या किंवा हिरवे गवत खायला दिल्यास बुध ग्रहाचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते. तसेच तुमचा बुध ग्रह मजबूत होतो. बुध ग्रह बलवान झाल्यावर तुमची सर्व बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि तुमची आयुष्यात प्रगती होते.

काय करावे दान

बुधवारी काही वस्तूंचे दान करणे खूप फायदेशीर मानले जाते. हिरवा मूग दान करणे खूप फलदायी मानले जाते. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते. तसेच गणेशासह भोलेनाथाचाही आशीर्वादही कायम राहतो.

बाप्पाला कोणत्या गोष्टी कराव्या अर्पण


बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. गणपतीला बाप्पा यामुळे खूप प्रसन्न होतात. तुमच्या आयुष्यात असणारी सर्व दुःख आणि समस्या दूर करतात.

बुधवारचा मंत्र


बुधवारी बुध ग्रहाच्या मंत्रांचा जप केल्याने तुमच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. तसेच एकाग्रता वाढवु शकता. यामुळे तुमचे मन विचलित होणार नाही. यामुळे तुम्हा कामावर लक्ष केद्रित करून आयुष्यात प्रगती करू शकता.

बीज मंत्र : ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः!

ॐ बुं बुधाय नमः अथवा ॐ ऐं श्रीं श्रीं बुधाय नमः!

ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:

प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम। सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम।।

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT