Left Over Chapati Breakfast Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breakfast Recipe: उरलेल्या चपातीपासून बनवा परफेक्ट उपमा, नोट करा रेसिपी

Left Over Chapati Breakfast Recipe: रात्री उरलेल्या चपातीपासून तुम्ही चवदार उपमा बनवू शकता.

दैनिक गोमन्तक

Left Over Chapati Breakfast Recipe: रोज सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो.तुम्ही जर रोज पोहे, उपमा, समोसा खाऊन बोर झाले असाल तर आज आम्ही तुम्हाला एक नवी रेसिपी सांगणार आहोत.

तुम्ही रात्री उरलेल्या चपातीपासून स्वादिष्ट उपमा बनवू शकता. हा उपमा बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया उरलेल्या चपातीपासून उपमा कसा बनवावा.

  • लागणारे साहित्य

4 चपाती

1 कांदा बारीक चिरलेला

1 टोमॅटो बारीक चिरून

2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून

अर्धी शिमला मिरची बारीक चिरून

1/2 टीस्पून मोहरी

अर्धा कप वाटाणे

1 टेबलस्पून शेंगदाणे

1 टीस्पून धणे पावडर

1/2 टीस्पून लाल तिखट

1 टीस्पून लिंबाचा रस

2 टेस्पून तेल

सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

  • कृती

सर्वात पहिले चपात्यांचे छोटे तुकडे करून घ्यावे.

नंतर गॅसवर पॅनवर ठेऊन तेल गरम करावे. 

त्यात मोहरी टाकावी.

मोहरी तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरच्या आणि कांदे घालून मध्यम आचेवर शिजवावे.

कांदे तपकिरे होईपर्यंत शिजु द्यावे, नंतर टोमॅटो, सिमला मिरची आणि वाटाणे घालून 3 मिनिटे शिजवावे.

यानंतर पॅनमध्ये धणे, लाल तिखट आणि शेंगदाणे घालून एक मिनिट शिजवावे.

आता चपातीचे तुकडे आणि मीठ घालून मिक्स करा. 2 मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.

उरलेल्या चपातीपासून गरमागरम उपमा तयार आहे. हिरव्या कोथिंबीरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT