Bitter Guard Health Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bitter Guard Health Benefits: तुमच्या 'या' आजारांवर उपयुक्त ठरेल कारल्याचे पाणी

Bitter guard Health Benefits: त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करतात.

दैनिक गोमन्तक

Bitter Guard Health Benefits: काही पदार्थ, काही फळभाज्या आपल्याला त्यांच्या चवीवरुन आवडत नाहीत. त्यापैकी सगळ्यात ज्या भाजीला नापसंती मिळते ती म्हणजे कारल्याला होय.

कारले चवीला अत्यंत कडू असल्याने अनेकजण कारले खाण्यासाठी नकार देतात. मात्र या कडू कारल्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे असल्याचे आपल्याला माहीत असते.

पण या कडू कारल्याचे पाणीदेखील आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकते.

1. त्वचा

जर तुम्ही नियमितपणे कारल्याचे पाणी प्यायले तर त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.

वास्तविक, यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे आपल्याला डाग, मुरुम, त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करतात.

2. मधुमेह

जे लोक सकाळी आणि संध्याकाळी कारल्याचे पाणी पितात त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कायम संतुलित राहते कारण या भाजीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट स्वादुपिंडाचे कार्य सुधारतात.

याशिवाय कारल्यामुळे मेटाबॉलिज्मला चालना मिळते, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवश्यक असते.

3. पचन

कारल्याचे पाणी पिणे पोटासाठी फायदेशीर आहे कारण त्यात भरपूर फॉस्फरस असते, ज्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

4. इम्युनिटी

आजकाल व्हायरल इन्फेक्शनचा धोका कायम राहतो, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप गरजेचे आहे, अशा परिस्थितीत तुम्ही दररोज दोनदा कारल्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

  • असे करा कारल्याचे पाणी तयार

कारल्याचे पाणी तयार करण्यासाठी, मोठी 2 कारली घ्या आणि त्यांच्या दोन्ही टोकांपासून अर्धे कापून घ्या. आता गॅसवर पाण्यात उकळा. गॅसवरून काढून थंड होण्याची वाट पहा.

थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि चवीनुसार मीठ घाला. आता हे पाणी साठवून ठेवा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही हे कारल्याचे पाणी पिऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT