Skin Care Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' 2 गोष्टींनी बनवा फेस पॅक, त्वचा राहिल ग्लोइंग

Skin Care Tips: त्वचेच्या समस्या प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या असतात. यामुळे ती निस्तेज आणि निर्जीव दिसते.

Puja Bonkile

Skin Care Tips: तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही वेळोवेळी तिची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पण यासाठी तुम्ही वेगवेगळी उत्पादने वापरावीत किंवा पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार घ्यावेत असे नाही. यासाठी घरात ठेवलेल्या वस्तूंपासून फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लावा. हे नैसर्गिकरित्या तयार केले जाते आणि त्वचेवर लावल्यानंतर ते निरोगी राहते. यासाठी तुम्हाला ते बनवण्याची आणि वापरण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे.

त्वचेवरील घाण आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरात ठेवलेले तांदळाचे पीठ वापरू शकता. याचा फेस पॅक तयार करा. याचा त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही, उलट त्याचा वापर त्वचेला सुखदायक परिणाम देईल. 

  • यासाठी तुम्हाला 1 चमचा तांदळाचे पीठ घ्यावे लागेल.

  • नंतर 2 चमचे मध आणि 1 चमचा ओट्स घ्या.

  • आता या गोष्टी मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे मॅश करून पेस्ट तयार करा.

  • हे मिश्रण मिक्स करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावा. 

  • यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

  • यामुळे त्वचा चमकदार दिसेल.

  • ग्रीन टी आणि हळद

ग्रीन टी चे अलनेक लोक सेवन करतात. तुम्ही ते तुमच्या त्वचेसाठी देखील वापरू शकता. कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात. जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे मुरुमांची समस्या दूर होते.

  • यासाठी सर्वप्रथम ग्रीन टीची पिशवी एका भांड्यात टाकून ती चांगली उकळावी.

  • नंतर एका भांड्यात 2 चमचे हळद घेऊन त्यात पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.

  • नंतर ते चेहऱ्यावर लावावे.

  • यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. 

  • लक्षात ठेवा की चेहरा स्वच्छ करताना साबण वापरू नका.

  • यामुळे तुमची त्वचा निरोगी दिसेल.

  • हे फेस पॅक वापरल्यास तुमची त्वचा कधीही निस्तेज दिसणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT