Benefits Of Drinking Onion Juice Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits Of Onion Juice : दररोज रिकाम्या पोटी कांद्याचा रस पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? एकदा वाचाच

कांद्याचा रस प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात.

दैनिक गोमन्तक

तुम्हाला माहित आहे का कांद्याचा रस प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात. जर नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी कांद्याचा रस पिण्याचे फायदे घेऊन आलो आहोत. कांद्याचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

एवढेच नाही तर कांद्याचा रस प्यायल्याने तुमचे केस आणि त्वचा दोन्ही चांगले राहते. यासोबतच ते तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत करते, चला तर मग जाणून घेऊया (Benefits Of Drinking Onion Juice)

कांद्याचा रस पिण्याचे फायदे

  • मजबूत प्रतिकारशक्ती

कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक सारखे गुणधर्म भरपूर असतात ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. म्हणूनच कांद्याच्या रसाचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते.

  • वजन कमी होणे

कांद्यामध्ये असे अनेक अँटी-ऑक्सिडेंट असतात जे तुमचे चयापचय सुधारण्यास मदत करतात. रिकाम्या पोटी कांद्याचा रस प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच हे शरीरातील डिटॉक्सिफिकेशनमध्येही उपयुक्त आहे, ज्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते.

  • निरोगी केस

कांद्याचा रस केसांना लावल्याने फायदा होतोच, पण कांद्याचा रस प्यायल्यास केस मजबूत होतात. कांद्याचा रस तुमच्या केसांना आतून पोषण देतो, ज्यामुळे तुमचे केस मजबूत आणि घट्ट दिसतात.

  • निरोगी त्वचा

जर तुम्हाला निरोगी त्वचा मिळवायची असेल तर त्यासाठी एका भांड्यात कांद्याचा रस घ्या. नंतर चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. या रसाचे सेवन केल्याने तुमचे शरीर आतून स्वच्छ होईल, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसू लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT