Beauty Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी जेड रोलर वापरताय? मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही जेड रोलर वापरू शकता.

Puja Bonkile

Beauty Tips: अनेक महिला चमकदार त्वचेसाठी विविध करत असतात. तसेच महगडे प्रोडक्ट वापरत असतात.पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. तसेच सध्याच्या धावपळीच्या काळात लोकांच्या त्वचेवर अनेक परिणाम होतात. यामळे कमी वयातच त्वेवर सुरकुत्या पडतात.

त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही जेड रोलर वापरू शकता. जेड रोलरचा डेली स्किन केअर रूटीनमध्ये वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावरील सूज आणि सुरकुत्या यासह अनेक समस्या कमी होतात. तुम्हालाही त्याचा वापर करायचा असेल तर त्याचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.

  • जेड रोलर म्हणजे काय

जेड रोलर चेहरा आणि मानेची मसाज करण्यासाठी वापरले जाते. हे जेड नावाच्या शोभेच्या खनिजापासून बनवले जाते. 17 व्या शतकापासून ते वापरले जाते. हे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी खूप मदत करते.

  • जेड रोलर वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

चेहरा स्वच्छ करा

जर तुम्हाला जेड रोलर वापरायचा असेल तर सर्वात पहिले चेहरा स्वच्छ करावा. जर तुमचा चेहरा स्वच्छ नसेल तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

जेड रोलर स्वच्छ ठेवावे

जेड रोलर वापरण्यापूर्वी ते नीट स्वच्छ करावे. असे न केल्यास अनेक प्रकारच्या जंतूंमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

सेंसेटिव्ह भागांपासून दूर ठेवावे

जर तुमच्या चेहऱ्यावर किंवा मानेवर कोणत्याही प्रकारची दुखापत झाली असेल तर जेड रोलर त्या भागावर जेड रोलरने मसजा करू नये. यामुळे होणार ६ास कमी होऊ शकतो.

प्रेशर देऊ नका

नेहमी चेहऱ्यावर मसाज करताना हलक्या हाताने करावे. तसेच चेहऱ्यावर रोड रोलर वापरताना जास्त दाब लावू नका कारण चेहरा खूप नाजूक असतो.

हे जेड रोलर वापरू नका

जर तुमच्या जेड रोलरमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रॅक असेल तर त्याचा वापर करू नका. यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT