Beauty Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Beauty Tips: पाठ काळवंडल्यामुळे बॅकलेस ड्रेस घालता येत नाहीय? 'या' टिप्सची घ्या मदत

तुम्हाला पाठ काळवंडल्यामुळे बॅकलेस ड्रेस आणि ब्लाउज घालता येत नसेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

beauty tips fashion try these home remedies lighten dark back

जेव्हा आपल्याला बॅकलेस ड्रेस घालावा लागतो तेव्हाच आपण पाठ स्वच्छ करणे आणि वॅक्सिंग करण्यावर भर देतो. परंतु बराच वेळ त्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केल्याने पाठ इतकी काळी पडते की वॅक्सिंग आणि साफसफाई करूनही काही फरक जाणवत नाही.

चेहरा आणि हातांच्या तुलनेत मागचा भाग पूर्णपणे वेगळा दिसतो. तुम्हीही लग्नात किंवा फंक्शनमध्ये बॅकलेस ड्रेस किंवा ब्लाउज घालणार असाल तर पुढील टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमची पाठ उजळ करू शकता.

कोरफड 

पाठीचा काळोख दूर करण्यासाठी कोरफडीचे जेल खूप प्रभावी आहे. यासाठी एका भाड्यांत सुमारे दोन चमचे कोरफडीचे जेल टाकावे आणि त्यात तेवढाच लिंबाचा रस घाला. दोन्ही गोष्टी नीट मिक्स करून मिश्रण तयार करा. या पेस्टने तुमच्या पाठीला मसाज करा. आंघोळीपूर्वी वापरा आणि 10 मिनिटांनी आंघोळ करा. रोजच्या वापराने काळी त्वचा उजळते. 

लाल मसूर 

खाण्याव्यतिरिक्त त्वचेची काळजी घेण्यासाठीही मसूरचा वापर केला जातो. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याचाच नव्हे तर पाठीचा रंगही सुधारू शकता. सर्वात पहिले मसूर बारीक करून पावडर बनवा. आता एका भांड्यात दोन चमचे लिंबाचा रस मसूराच्या डाळीत मिसळा. त्याचा प्रभाव आणखी वाढविण्यासाठी, कोरफड वेरा जेल आणि दही देखील जोडले जाऊ शकते. नंतर पाठीवर लावा आणि सुकल्यानंतर हलक्या स्क्रबिंगने धुवा.  

बेसण

त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसनाचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. त्वचा मऊ करण्यासाठी आणि रंग सुधारण्यासाठी बेसन खूप चांगले आहे. तुमची पाठीचा काळेपणा कमी करण्यासाठी बेसनाचाही वापर करू शकता. यासाठी बेसन, दही, हळद आणि लिंबाचा रस किंवा गुलाबपाणी एका भांड्यात मिक्स करावे. सर्व साहित्य मिक्स करून पेस्ट बनवा. पाठीवर लावा आणि नीट कोरडे होऊ द्या. आंघोळीपूर्वी देखील याचा वापर करू शकता. काही आठवड्यांत तुम्हाला फरक दिसू लागेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: मंत्री रवी नाईक यांना कोडारवासियांचे IIT विरोधात निवेदन

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT