Bad Breath Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bad Breath: श्वासाची दुर्गंधी येणे असू शकते 'या' आजारांचे लक्षण, वेळीच साधा डॉक्टरांशी संपर्क

Puja Bonkile

bad breath know about bad breath cause of serious diseases take care our health

अनेक लोकांना श्वसनासंबंधित समस्या असतात. जे लोक आहारात कांदा आणि लसूणचा समावेश करतात तेव्हा श्वासाची दुर्गंधी येऊ शकते.

पण तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी नेहमीच श्वासाच्या दुर्गंधीचे कारण नसतात. कधीकधी ते काही आजारांचे लक्षण असू शकते.

तोंडातून दुर्गंधी येणे याला हॅलिटोसिस असेही म्हणतात. ज्या लोकांना जवळजवळ दररोज श्वासाची दुर्गंधी येते त्यांना काही आजार असू शकतात. श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. श्वासाची दुर्गंधी लपवणे हा समस्येवर उपाय नसून त्यासंदर्भात डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

  • हिरड्यासंबंधित आजार

जर तुम्हाला हिरड्यांसंबंधित आजार असेल तर तोंडीतून दुर्गंधी येऊ शकते. जसे की हिरड्यांना आलेली सूज, पीरियडॉन्टायटिस किंवा कोरडे तोंड, यामुळे तुमच्या श्वासाला आणि तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.

जेव्हा हिरड्यांचा आजार होतो तेव्हा, लाळ ग्रंथी तुमचे तोंड ओलसर ठेवण्यासाठी पुरेशी लाळ तयार करू शकत नाहीत. ज्यामुळे तुम्हाला वारंवार श्वासाची दुर्गंधी येऊ शकते. अशावेळी तुम्ही तुमच्या तोंडाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासोबतच डेंटल एक्सपर्टला भेटून त्यांचा उपचारास सुरूवात करावी.

  • सायनस

जे लोक सायनसच्या संसर्गाने त्रस्त असतात त्यांना तोंडाला दुर्गंधीला सामोरे जावे लागू शकते. सायनस संसर्गामुळे श्लेष्मा तयार होऊ शकतो, जो घशाच्या मागील बाजूस असतो. श्लेष्मामध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे श्वासाची दुर्गंधी येऊ शकते.

  • मधुमेह

मधुमेह नियंत्रणात न ठेवल्यास श्वासाची दुर्गंधीही येऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या श्वासातून गोड वास येत असेल तर ते तुम्हाला डायबेटिक केटोॲसिडोसिस होत असल्याचे लक्षण आहे. टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांसाठी डायबेटिक केटोआसिडोसिस खूप धोकादायक आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा किडनी निकामी होऊ शकते. यामध्ये तोंडाला फक्त वास येत नाही तर वारंवार लघवी होणे, मळमळ होणे आणि स्नायू कडक होणे अशी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे आरोग्य तज्ञांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.

  • श्वसन संक्रमण

काहीवेळा श्वासोच्छवासाच्या संसर्गामुळे श्वासाची दुर्गंधी देखील येऊ शकते. टॉन्सिलिटिस, सायनसायटिस किंवा ब्राँकायटिस यांसारख्या श्वसन संक्रमणांमुळे शरीरात बॅक्टेरिया आणि जळजळ होते आणि श्वासाची दुर्गंधी येऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा

  • छातीत जळजळ होणे

अनेक लोकांना मसालेदार पदार्थ खाल्याने छातीत जळजळ होते. तोंडात दुर्गंधी येण्याचे हे मुख्य कारण म्हणजे तोंडातील बॅक्टेरिया असू शकते. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की काही वेळा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज म्हणजेच जीईआरडी सारख्या जीआय विकारांमुळे लोकांना दुर्गंधी येऊ शकते. जीईआरडी ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या पोटातील पदार्थ अन्ननलिकेमध्ये परत येते. त्यामुळे श्वासाच्या दुर्गंधीची समस्या निर्माण होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT