Baby mother and Goa tradition  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

बाळ बाळंतीण आणि गोमंतकीय रीतीभाती

गोव्यातल्या अनेक बाळंतिणी काही बाबतीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला पाळत नाहीत आणि परंपरागत चालत आलेल्या प्रथा आणि रीती यांचेच पालन करतात.

दैनिक गोमन्तक

बाळाच्या जन्मानंतर आई जे सोपस्कार पार पाडते, ते सोपस्कार किंवा विधी आईच्या आणि समाजाच्या मनात खोलवर रुतलेले असतात. गोव्यातल्या आया बाळाच्या जन्मानंतर ज्या काही चालीरीती अवलंबतात, त्याबद्दल एक वेधक अहवाल डॉक्टर प्रेक्षा वेर्णेकर, जगदीश काकोडकर, मीनाक्षी पाणंदिकर आणि इरा आल्मेदा यांनी मिळून तयार केला आहे. हे चारही जण गोव्यातल्या वैद्यकीय संस्थात ज्येष्ठ पदावर आहेत.

त्यांच्या असे लक्षात आले होते की गोव्यातल्या अनेक बाळंतिणी काही बाबतीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला पाळत नाहीत आणि परंपरागत चालत आलेल्या प्रथा आणि रीती यांचेच पालन करतात. प्रसवोत्तर काळात यातल्या अनेक कृती आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतात. गोव्यात चालत असणाऱ्या अशा रीतींची नेमकी माहिती मिळवणे हा त्यांच्या संशोधनामागचा हेतू होता. या संशोधनातून एक गोष्ट नेमकी कळून आली की बाळंतिणीच्या आरोग्याच्या दृष्टीने, आरोग्य व्यवसायिकांनी काही गंभीर बाबींबद्दल लक्ष देणे आणि त्यासंबंधाने जागृतता करणे आवश्यक आहे.

विशेषज्ञांच्या मते यातल्या काही प्रथा जशा, बाळंतपणानंतर आईने स्वतःला घरात कोंडून घेणे हे आईच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे आणि ते थांबणे आवश्यक आहे. पण काही प्रथा, ज्या मुलाच्या बारशाच्या वेळी पार पाडल्या जातात, त्या आई आणि तिचे कुटुंबीय यांच्यात चांगले दृढबंध तयार होण्याच्या दृष्टीने उपकारक असतात मात्र आरोग्य व्यवसायिकांनी, डॉक्टरांनी चांगला आरोग्यविषयक सल्ला देण्यासाठी या प्रथांची योग्यरीत्या ओळख करून घेणे गरजेचे आहे. काही निरुपद्रवी प्रथा जर सांस्कृतिकरित्या योग्य आणि स्वीकारण्यासारखा असतील तर डॉक्टरांनी त्यां आपल्या समाजाचा संपन्न वारसा समजून त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. हा त्यांचा संशोधन अहवाल ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह आणि कम्युनिटी मेडिसीन’मध्ये प्रकाशित झाला आहे.

काय आहे या अभ्यासामागचा नेमका निष्कर्ष?

  • 97.50 % आया बाळ जन्माला

  • आल्यावर त्यांना स्तनपान देतात.

  • प्रसूतीनंतर स्तनातून येणारा स्त्राव 96.25 % आया बाळांना पाजतात.

  • आपल्या नवजात बाळाला नवीन

  • स्वच्छ कपड्यात गुंडाळणाऱ्याची संख्या लक्षणीय, 83.75 % होती.

  • 72.5 टक्के आया आपल्या बाळाला जन्मानंतर पाच दिवसांनी आंघोळ घालतात.

  • नाळ कापल्यानंतर 58.75%

  • आया बाळाच्या बेंबीला कुठल्याही प्रकारची मलमपट्टी करत नाहीत.

  • 42.5 % आया मुलाची नाळ घराच्या अंगणात पुरतात. 31.3 टक्के मुलांची नाळ घरात ठेवली जाते, 9 टक्‍के मुलांची नाळ तावीजात बांधलेली असते.

  • 22.5 टक्के आया बाळाच्या जन्मानंतर, 40 दिवसापर्यंत स्वतःला घरातच कोंडून घेतात.

  • 50 टक्के आया बाळाच्या चेहऱ्यावर

  • आणि डोळ्यांना काजळ लावतात.

  • 35 टक्के आया बाळांच्या हातात

  • बांगड्या घालतात, 16.25 % आया बाळाच्या पायात साखळी घालतात.

  • शेवटचे तिन्ही उपाय बाळाला नजर लागू नये म्हणून कुटुंबीयांकडून केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT