Ayurveda Tips For Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ayurveda Tips For Health: आयुर्वेदात सांगितलेली 'ही' खास गोष्ट अनेक आजारांवर आहे घरगुती उपचार

आयुर्वेदात सांगितलेली खास गोष्ट म्हणजे अनेक आजारांवर घरगुती उपचार आहेत, ज्याचा वापर करण्यासाठी ना दवाखान्यात जावे लागणार आहे ना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Puja Bonkile

Ayurveda Tips For Health: आयुर्वेदामध्ये अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत. पण काही लोक शारीरिक आणि मानसिक आजारांपासून आराम मिळवण्यासाठी रुग्णालयांकडे वळत आहेत. तर काही लोक आजही आयुर्वेदाला प्रत्येक आजारासाठी प्रादान्य देत आहे.

आयुर्वेदाची खास गोष्ट म्हणजे अनेक आजारांवर घरगुती उपचार आहेत, ज्याचा वापर करण्यासाठी ना दवाखान्यात जावे लागणार आहे ना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. तुम्हाला फक्त संयम ठेवावा लागेल.

आयुर्वेदानुसार तुम्ही देशी तुपाचे नाव ऐकले असेल, जे स्वयंपाकात तसेच अनेक आजारांवर उपचारात वापरले जाते. रोज नाकात शुद्ध देसी तूप टाकल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

तुम्हाला हे फायदे मिळतील

1. मेंदूसाठी फायदे

आयुर्वेदानुसार (Ayurveda) नाकात तूप टाकल्याने मेंदूचे कार्य सुरळित कार्य करते. हे नसा मजबूत करते, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. असे कल्याने चिंता, तणाव यासारख्या मानसिक आजारांपासून देखील आराम मिळतो.

2. डोकेदुखी

जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात तूप टाकावे. तुम्हाला डोकेदुखीपासून आराम तर मिळेलच पण मायग्रेनच्या त्रासापासूनही आराम मिळेल. 

3. झोपची समस्या

जर तुम्हाला झोपेची (Sleep) समस्या असेल तर हा आयुर्वेदिक उपाय नक्की करून पहा. रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात तुपाचे दोन थेंब टाकल्यास तुम्हाला चांगली झोप लागेल. 

sleeping

4. चमकदार त्वचा

ज्या लोकांना चमकदार त्वचा (Skin) हवी आहे त्यांनीही नाकात तूप टाकावे. यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि कोरडी त्वचेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. 

5. केसांचे आरोग्य

केसांच्या (Hair) समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनीही नाकात तूप टाकावे. यामुळे केसगळतीची समस्या तर दूर होईलच, पण केसांची मजबुतीही कायम राहील.

  • देशी तुपाचे फायदे

नेटमेड्सच्या मते, तुपात लिनोलिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात आढळते, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. देसी तुपात आढळणारे सॅच्युरेटेड फॅट शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. यासोबतच तुपाचे सेवन केल्याने चयापचय देखील वाढतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. (Health Tips In Marathi)

तुपात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्यास आणि ऊर्जा पुरवण्यास मदत करते.

तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात जे शरीरातील सूज टाळतात. तसेच हे हार्मोन्स समतोल राखण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात.

तूप डोकोसाहेक्साएनोइक ऍसिडचा चांगला स्रोत म्हणून ओळखला जातो. ओमेगा 3 फॅटी ऍसिड डोकोसाहेक्साएनोइक ऍसिडमध्ये आढळतात. हे आपल्या शरीरात तयार होत नाही, म्हणून ते अन्नाद्वारे घेणे आवश्यक आहे.

DHA कर्करोग, हृदयविकाराचा झटका, इन्सुलिन प्रतिरोधकता, संधिवात आणि अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर यांसारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. मन शांत करून स्मरणशक्ती वाढवण्यासही तूप मदत करू शकते. काही लोकांना वारंवार उचकी येण्याचा त्रास होतो, त्यांनी एक चमचा तूप खाल्ल्याने त्यांना उचकीपासून आराम मिळतो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT