Planting  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

बारमाही झाडे लावताय? मग 'या' चुका करणे टाळा

जर तुम्ही घरातील गार्डनमध्ये ही बारमाही झाडे लावण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

आपल्या सर्वांना बागकाम करायला आवडते. साधारणपणे आपण सर्वजण आपल्या बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावतो. यापैकी बहुतेक झाडे हंगामी आहेत, परंतु काही झाडे बारमाही असतात. त्यामुळे ही झाडे वर्षभर बहरतात आणि तुमची बाग हिरवीगार दिसते.  अनेकवेळा लोक त्यांच्या झाडांमध्ये बारमाही रोपे लावतात कारण त्यांना इतर झाडांच्या तुलनेत काळजी कमी घ्यावी लागते. पण असे नाही बारामाही झाडांची देखील काळजी घेणे गरजेचे असते.

 योग्य ठिकाणी न ठेवणे

काही लोकांना असे वाटते की बारमाही झाड कोणत्याही वातावरणात सहज वाढू शकतात, म्हणून ते त्यांना कुठेही ठेवू शकतात. मात्र, तसे नाही. जर तुम्हाला तुमच्या रोपाच्या गरजा समजल्या आणि त्या योग्य ठिकाणी ठेवल्या नाहीत तर तुमच्या रोपाची वाढ चांगली होत नाही. हे शक्य आहे की काही वनस्पतींना तेजस्वी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि काही सावलीत वाढतात. म्हणून, तुम्ही प्रथम तुमची रोपे समजून घ्या आणि नंतर ती तुमच्या घरात किंवा बागेच्या परिसरात लावा.

एकमेकांच्या अगदी जवळ रोपे लावणे

आपण कदाचित याकडे लक्ष देणार नाही, परंतु बारमाही रोपे लावताना ही एक सामान्य चूक असू शकते. जेव्हा आपण रोप लावतो तेव्हा ते खूप लहान असते आणि म्हणूनच आपण नकळत रोपे एकमेकांच्या अगदी जवळ लावतो. परंतु बारमाही झाडे वर्षानुवर्षे वाढतात. अशावेळी जेव्हा त्यांची वाढ खूप जास्त होते, तेव्हा त्यांना इतर वनस्पतींच्या अगदी जवळ असल्यामुळे हवेचा प्रवाह चांगला होत नाही. त्यामुळे त्यांच्या वाढीवरही विपरीत परिणाम होतो. बर्‍याच वेळा, यामुळे झाडांना रोग किंवा आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.  

कीटकांकडे दुर्लक्ष करणे

जरी बारमाही झाडे असले तरीही कीटक किंवा रोग हानी पोहोचवू शकतात. पण बहुतेक लोकांना हे समजत नाही. त्यांना वाटते की हे झाड बारमाही आहे, त्यामुळे ती सहज वाढू शकते. तुम्हीही या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास बारमाही झाडं मरू शकते. म्हणून, वेळोवेळी आपल्या रोपाची तपासणी करत रहावी.

देखभाल न करणे

बारमाही झाडांना साधारणपणे कमी देखभालीची आवश्यकता असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पाहिजे. तुमच्या बागेतील इतर वनस्पतींप्रमाणेच तुम्ही बारमाही झाडांची देखील काळजी घेतली पाहिजे. विशेषतः डेडहेडिंग किंवा कोमेजलेली फुले काढून टाकणे इत्यादी गोष्टी नियमितपणे कल्या पहिजे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT