PCOD Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Food To Avoid PCOD: पीसीओडी असलेल्या महिलांनी नाश्त्यात 'हे' 3 पदार्थ खाणे टाळावे

Foods to avoid in PCOD problem: पीसीओडीची समस्या असलेल्या महिलांनी आहाराची काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

3 Foods You Should Never Consume in PCOD

पीसीओडी (PCOD) म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसीज आजकाल महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या समस्येमध्ये अंडाशयात लहान गाठी तयार होतात.

यामुळे, महिलांच्या शरीरात हार्मोनल असंतुलन होते. कारण या गाठी मासिक आणि गर्भधारणा या दोन्हीवर परिणाम करतात. पीसीओडीच्या इतर लक्षणांमध्ये वजन वाढणे, मासिक पाळीची तारिख चुकणे, झोपायला त्रास होणे, थकवा जाणवणे, चेहऱ्यावर नको असलेले केस आणि पोटाच्या समस्या यांचा समावेश होतो. काही महिलांचे पीसीओडी असूनही त्यांचे वजन वाढत नाही. याला लीन पीसीओडी म्हणतात.

PCOD ची लक्षणे पूर्ववत करण्यासाठी योग्य आणि पोषक आहार घेणे खूप गरजेचे आहे. योग्य वेळी खाणे आणि झोपणे आणि योग्य वेळी उठणे हेही महत्त्वाचे आहे.

PCOD मध्ये तुम्ही काही गोष्टी आरोग्यदायी मानून नाश्त्यात खातात, पण प्रत्यक्षात ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवते. असे कोणते पदार्थ आहेत हे जाणून घेऊया.

चहा-कॉफी

अनेक घरांमध्ये नाश्त्यात चहा आणि कॉफीसोबत ब्रेड, टोस्ट, खारी खाल्ले जाते. जर तुम्हाला पीसीओडी असेल तर तुम्ही ते नाश्त्यात खाऊ नका. त्यात कॅफिन जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते आणि इस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि पीसीओडी च लक्षणे अधिक दिसून येतात.

फळाचा रस

फळांच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे नाश्त्यात फळांचा रस घेणे टाळावे. प्रथिने युक्त नाश्ता तुम्ही कोणतेही एक फळ खाऊ शकता.

प्रक्रिया केलेले पदार्थ

जर तुम्ही नाश्त्यामध्ये दुधासोबत तृणधान्ये खात असाल आणि तो एक आरोग्यदायी पर्याय मानत असाल तर PCOD किंवा PCOS मध्ये ते अजिबात आरोग्यदायी नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर परिणाम होतो. यामुळे अशा पदार्थांचे सेवन टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raksha Bandhan: 'या' देवांना राखी बांधा, संकटाना दूर पळवा! जाणून घ्या रक्षाबंधनाचे महत्व

Beach Sports Tourism Hub: आता ऑस्ट्रेलिया, ब्राझीलला जायला नको, गोवाच बनणार 'बीच स्पोर्ट्स टुरिझम हब'! सरकारची नवी योजना

Barabanki Accident: चालत्या बसवर कोसळलं झाड, चालकासह 5 प्रवाशांचा मृत्यू; लोकांनी खिडकीतून उडी मारून वाचवले प्राण Watch Video

Goa Assembly Live Updates: अमेरिकेच्या निर्णयामुळे गोव्याचा महसूल आणि रोजगार घटणार, आमदार वीरेश बोरकर यांचा इशारा

Viral Video: ‘ती’ म्हणेल तेच खरं! पठ्ठ्यानं गर्लफ्रेंडसमोर मित्राला ठरवलं चुकीचं, प्रेमात हरलं लॉजिक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT