Avoid doing 'these' things after facials Dainik Gomantak
लाइफस्टाइल

फेशियलनंतर 'या' गोष्टी करणे टाळा

फेशियल केल्यानंतर चेहऱ्याची काळजी घेणे आवश्यक असते.

दैनिक गोमन्तक

कोणत्याही समारंभाला किंवा पार्टीला जाण्यापूर्वी अनेक महिला पार्लरमध्ये जावून फेशियल (Facials) करतात. फेशियल हे स्कीनच्या (Skin) प्रकारानुसार केले जाते. फेशियल केल्याने त्वचा उजळ आणि चमकदार दिसते. फेशियलचे (Facials) गोल्ड फेशियल, फ्रूट फेशियल यासारखे अनेक प्रकार असतात. फेशियल केल्याने त्वचेवरील टॅन (Tan) कमी होतो. फेशियल केल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे हे आज जाणून घेवूया.

* थ्रेडींग करणे टाळावे

फेशियल (Facials) केल्यानंतर थ्रेडींग करणे टाळावे. फेशियलनंतर त्वचा (Skin) नाजुक होते. तुम्ही जर फेशियलनंतर थ्रेडींग केली तर दोऱ्यांचे कट्स लागू शकतात. म्हणूनच फेशियल करण्यापूर्वी थ्रेडींग करावे .

* उन्हामध्ये जाणे टाळावे

फेशियल केल्यानंतर उन्हात जाऊ नये. कारण उन्हात गेल्यास चेहऱ्यावर धूळ चिपकून बसू शकते. यामुळे जर तुम्हाला बाहेर जायचे असेल तर चेहरा पूर्णपणे स्कार्फने झाकून घ्यावा.

* फेशियलनंतर स्क्रब करणे टाळावे

फेशियलनंतर तीन ते चार दिवस स्क्रब करणे टाळावे. फेशियलमुळे त्वचा नाजुक बनते. त्यामुळे जर तुम्ही फेशियल केल्यानंतर स्क्रब केले तर चेहरा कोरडा पडू शकतो.

* फेस मास्क लावणे टाळावे

फेशियलमुळे चेहरा चमकदार होतो. त्यामुळे फेशियल केल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर काहीच लावत येत नाही. तुम्ही जर फेस मास्क लावत असला तर तुमच्या चेहऱ्यांवरील चमक कमी होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT