महारथ Dainik Gomantak
लाइफस्टाइल

श्री शांतादुर्गा येथील महारथाचे गोवेकरांना आकर्षण

महारथांच्या साजात फळांची माटोळी, पताका आणि चितारी कलाकारांनी रंगवलेली देवांची चित्रे यांचा समावेश असतो.

दैनिक गोमन्तक

आज पहाटे सूर्योदयाच्या मुहूर्तावर निघालेल्या महारथाने फातर्पे येथील गेले पाच दिवस चाललेल्या श्री शांतादुर्गा (Shri Shantadurga) कुंकळ्ळीकरीण देवीच्या जत्रोत्सवाची सांगता झाली असेल. या रथाला पारंपरिक पद्धतीने सजवले होते कुंकळ्ळी गावच्या चितारी समाजामधल्या चार कुटुंबियांच्या सदस्यांनी. महारथाचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य असते, कळसाच्या सर्वात वरच्या भागावर रंगवलेली देवदेवतांची चित्रे. ही चित्रे नीलेश चितारी आणि अमित चितारी यांनी रंगवली होती.

हा रथ सजवण्याचा (Decorate) मान फार पूर्वी काळापासून तिथल्या चितारी घराण्यातल्या चार कुटुंबियांना मिळाला आहे. कुंकळ्ळीच्या (Cuncolim) च्यारी कुटुंबियांकडून महारथ घडवला जातो तर रथास साज त्यानंतर चितारी कुटुंबियांकडून चढवला जातो. या साजात फळांची माटोळी, पताका आणि चितारी कलाकारांनी रंगवलेली देवांची चित्रे यांचा समावेश असतो. माटोळीसाठी आवश्यक असलेली फळे (Fruits) देवीचे भक्तगण पुरवतात. आपल्या झाडांवर नुकतीच आलेली फळे मोठ्या अपूर्वाईने देवीच्या रथासाठी दान केली जातात. देवीचा जत्रोत्सव साधारण डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान येऊनदेखील अनेकदा या माटोळीत आंबे (Mango) आणि फणस या उन्हाळी (Summer) फळांचाही समावेश झालेला आहे. मात्र यंदा पाऊस लांबल्यामुळे माटोळीत या फळांचे दिसणे दुर्लभ होते.

महारथाच्या कळसावर मांडली गेलेली चित्रे पारंपरिक पद्धतीनेच अजूनही रंगवली जातात. कळसावर त्यांची रचनाही पारंपरिक पद्धतीनेच होते. बांबूच्या वेतापासून तयार केलेल्या चटईवर, चिंचेच्या बियांपासून तयार केलेल्या डिंकाने त्यावर आधी कापड चिकटवले जाते. (चिंचेच्या बिया का, तर त्यांच्यापासून तयार झालेल्या डिंकाला उंदीर किंवा झुरळे लागत नाहीत. चिंचेच्या बियांची पावडर बनवून ती उकळल्यानंतर हा डिंक बनतो.) चिकटवलेले कापड नंतर पांढऱ्या रंगाने रंगवले जाते. तयार केलेली पार्श्वभूमी रंगवून त्यावर ही चित्रे मांडली जातात. कळसाच्या आठ बाजूंसाठी आठ देवदेवतांची चित्रे तर आठ राक्षसांची तोंडे रंगवली जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT