Astro Tips of Cat for Money Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips : मांजरीला धन लक्ष्मी यंत्र का म्हणतात? जाणून घ्या खरे कारण

Astro Tips for Money : मांजरीने तुमचा रस्ता ओलांडला तर ते अशुभ आहे, काम बिघडते, असे म्हटले जाते. पण मांजर शुभही असू शकते.

दैनिक गोमन्तक

मांजरीने तुमचा रस्ता ओलांडला तर ते अशुभ आहे, काम बिघडते, असे म्हटले जाते. पण मांजर शुभही असू शकते. मांजर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बनवू शकते, असा अनेकांचा समज आहे. मांजरीची नाळ लक्ष्मी यंत्राचे काम करते. मांजरीचे दर्शन आणि आगमन शुभ असते.

ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी आणि कुबेराला संपत्तीची देवता म्हटले जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनातील पैशाशी संबंधित त्रास दूर होतात. ज्योतिषशास्त्रात मांजरीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना घरातील ज्येष्ठांना मांजर दिसल्यास ते शुभ मानले जाते. मांजरीचे दर्शन होणे, मांजरीचे आगमन शुभ असते, असे म्हणतात.

(Astro Tips for Money)

ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की, मांजरीची नाळ लक्ष्मी यंत्राचे काम करते, जर तिची काळजी घेतली तर तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता. मांजरीची नाळ आपल्याजवळ ठेवल्याने माणसाच्या आयुष्यात कधीही गरिबी येत नाही.

शास्त्रानुसार मांजरीची नाळ शोधणे फार कठीण असते. असे म्हणतात की, एखाद्याचं नशीब खूप चांगलं असतं, फक्त त्यालाच नाळ मिळते. ती कोणाच्या हातात पडली तर त्याचे नशीब बदलू शकते, अशी मान्यता आहे.

लक्ष्मी यंत्र म्हणजे काय

लक्ष्मी यंत्र हे सर्वात पवित्र आणि शक्तिशाली साधन आहे, ज्याद्वारे तुमच्या जीवनात पैशांचा पाऊस पडतो, आर्थिक संकट कायमचे टळते आणि ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते. हे लक्ष्मी यंत्र केवळ संपत्तीचे प्रतीक नाही तर असाधारण सिद्धी आणि समृद्धीचे स्त्रोत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT