Money Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astrology Tips: तुमच्याही हातात आलेली सॅलरी लगेच संपते; राशीनुसार करा 'हे' उपाय

अनेक लोकांचे पैसे हे हातात येताच संपून जातात.

दैनिक गोमन्तक

Astrology Tips For Saving Money: हिंदू धर्मात दान करण्याला खुप महत्व आहे. दान केल्याने पुण्य प्राप्त होते असे हिंदू धर्मात सांगितले आहे. अनेकदा सण उत्सवांच्या निमित्ताने म्हणूनच दानाला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे.

अनेक लोक खूप मेहनतीने पैसे कमावतात पण पहिल्या तारखेला त्यांच्या हाती पगार असतो, मात्र त्यामागे उभे असतात प्रचंड खर्च. त्यमुळे पहिल्या तारखेला हाती पगार येऊनही पाच तारखेपर्यंत अनेकांचा खिसा रिकामा होत असलेला पाहायला मिळतो.

विशेष ज्योतिषीय उपाय करणे आवश्यक असते. ज्योतिष आणि वास्तूनुसार (Vastu) ग्रहांचा प्रभाव दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जाऊ शकतात आणि व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारली जाऊ शकते. जर तुमचा पगारही लवकर संपत असेल आणि दर महिन्याला नवीन खर्च समोर येत असेल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार हे उपाय करून पाहू शकता.

  • मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी हा उपाय करावा

मेष, सिंह किंवा धनु राशीच्या लोकांचा पगार लवकर संपत असेल आणि नवीन खर्च येत असतील तर पगाराचा काही भाग दान करावा. अन्न आणि पेय गरीब आणि गरजूंना दान केले पाहिजे. याशिवाय उडीद डाळीचे पदार्थही गरिबांना खायला द्यावेत. या गोष्टी दान केल्याने ऑफिसमधला (Office) तणावही (Stress) कमी होईल आणि कोणतीही दुर्घटना टळू शकेल.

  • वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या व्यक्तींनी या गोष्टींचे दान करा

वृषभ, कन्या किंवा मकर राशीच्या लोकांनीही आपल्या उत्पन्नाचा काही भाग दान करावा. या तीन राशीच्या लोकांनी दर शनिवारी (Shani Dev) शनिदेवाला तेलही अर्पण करावे, असे केल्याने खर्चही कमी होईल आणि इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल.

  • मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीच्या व्यक्तींनी या गोष्टी कराव्यात

मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीच्या व्यक्तीचा पगार लवकर खर्च होत असेल तर त्याच्या पगाराचा काही भाग गरिबांच्या आरोग्यावर (Health) खर्च करावा. हॉस्पिटलला देणगी द्या. गरिबांनाही औषधी वाटप करता येतात. असे केल्याने पदोन्नतीची शक्यताही निर्माण होईल आणि नोकरीत (Job) कोणताही अडथळा येणार नाही.

  • कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीच्या व्यक्तींनी कराव्या या गोष्टी

कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीच्या लोकांनी पगार मिळाल्यावर कपडे किंवा बूट दान करावेत. या गोष्टी तुमच्या घराच्या आजूबाजूच्या वृद्ध व्यक्तीला प्रेमाने द्या. याशिवाय तहानलेल्यांना पाणी देण्याचीही व्यवस्था करावी. यामुळे दीर्घायुष्य लाभते, आरोग्य सुधारण्याबरोबरच आर्थिक सुबत्ताही येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT