Astro Tips For Tulsi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Tulsi: घरात तुळशीचे रोप का लावावे? शास्त्रात काय सांगितलंय घ्या जाणून

धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते.

Kavya Powar

Astro Tips For Tulsi: धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते. तुळशीच्या पानांचा वापर भगवान शिव आणि गणपतीची पूजा वगळता जवळपास सर्व प्रकारच्या पूजेमध्ये केला जातो. हे विशेषत: भगवान विष्णूच्या पूजेमध्ये वापरले जाते.

असे मानले जाते की भगवान विष्णूला तुळशी खूप आवडते. यामुळेच तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हणतात. तुळशीचे रोप पूजनीय मानले जाते. असे मानले जाते की घरात तुळशीचे रोप लावून त्याला नियमित पाणी अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

शास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचे रूप सांगितले आहे, म्हणजेच जिथे तुळशी असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो. चला जाणून घेऊया तुळशीचे रोप लावून त्याची नियमित पूजा केल्याने कोणते फायदे होतात….

तुळशीची पूजा केल्याने होतात 'हे' फायदा

धार्मिक शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाखाली दिवा लावून पूजा करावी. त्या व्यक्तीचे दोष नाहीसे होतात. तुळशीसोबतच भगवान विष्णूची कृपाही तुम्हाला मिळेल.

घरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तूमध्येही तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले जाते. वास्तूनुसार तुळशीचे रोप आर्थिक स्थितीसाठीही शुभ मानले जाते.

घरामध्ये तुळशीचे रोप लावून त्याची नियमित पूजा केल्याने मनाला शांती मिळते. तसेच तुळशीचे रोप घरामध्ये संकटे येण्यापासून रोखते.

तुळशीचे रोप लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

असं म्हणतात की चुकीच्या दिशेने लावलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरात अशांतता येते. तुळशीच्या रोपासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर आणि ईशान्य मानली जाते. हे रोप घराच्या दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये.

घराच्या छतावर तुळशीचे रोप कधीही लावू नये. त्यामुळे कर्जाची समस्या किंवा आर्थिक समस्या कायम राहतात. याशिवाय तुम्ही एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे लावत असाल तर लक्षात ठेवा की ही रोपे तुम्ही 3, 5, 7 अशा विषम संख्येने लावावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT