Appe Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Aappe Recipe: सकाळच्या नाश्तात बनवा झटपट स्पेशल साउथ इंडियन डिश

Appe Recipe: केरळ स्पेशल अप्पे बनवण्याची सोपी रेसिपी नक्की वाचा.

दैनिक गोमन्तक

Appe Recipe: सकाळचा नाश्ता उत्तम आरोग्यासाठी खूप गरजेचा आहे. सकाळी भरपूर नाश्ता केल्याने दिवसभर एनर्जी लेवल चांगली राहते. काम करण्याचा उत्साह वाढतो. आपल्या देशात वेगवेगळ्या भागात सकाळच्या नाश्तासाठी अनेक पदार्थ फेमस आहेत. याच पदार्थांपैकी अप्पे पण आहेत. अप्पे साऊथची पारंपारिक डिश आहे. चला तर जाणून घेऊयात या चविष्ट डिशची खास रेसिपी.

South Indian dish
  • साहित्य

अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

दिड वाटी रवा,

दिड वाटी दही,

दिड वाटी हिरवा वटाणा,

दिड वाटी फ्लॅावर,

अप्पे बनवण्यासाठी हे पदार्थ (Food) लागतात. तसेच

अर्धा चमचा मोहरी,

अर्धा चमचा आलं पेस्ट,

तीन हिरव्या मिरच्या,

फोडणीसाठी थोडा कडीपत्ता,

अर्धा चमचा बेकींग सोडा,

दोन चमचे तेल,

चवीनुसार मीठ हे साहित्य लागते.

  • अप्पे बनवण्याची कृती

अप्पे बनवण्यासाठी प्रथम फ्लॅावर, हिरवी मिरची आणि आलं कापून मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावे. आता एका बाऊलमध्ये रवा घ्या. त्यात दही घालून हे मिश्रण चांगले मिक्स करुन घ्यावे. त्यानंतर यामध्ये फ्लॅावर,आलं आणि मिरचीचे जे मिश्रण तुम्ही बनवला आहे ते मिक्स करावे. काळजी घ्या की हे सर्व मिश्रण जास्त घट्ट होणार नाही. त्यात वेळोवेळी पाणी घालून पातंळ करत रहावे.

Appe

हे मिश्रण थोडावेळ तसेच ठेवा. त्यामुळे रवा छान फुगेल. आता गॅसवर कढई ठेऊन त्यात तेल गरम करावे. त्या गरम तेलात मोहरी, कडीपत्ता टाकून तुम्ही बनवलेल्या सर्व मिश्रणाला फोडणी द्या. आता अप्पे बनवण्याच्या भांड्याला तेल लावा. मग त्यामध्ये थोडे थोडे मिश्रण भरावे. आता मिडियम गॅसवर अप्पे शिजवा, एका बाजूने गोल्डन ब्राउन रंग आल्यावर अप्पे दुसऱ्या बाजुने पलटा. दोन्ही बाजुने छान ब्राउन रंग आल्यावर गॅस बंद करा. तुमची केरळ स्पेशल रेसिपी (Recipe) र्सव्ह करण्यासाठी तयार आहे. तुम्ही टोमॅटो सॅास, खोबऱ्याची चटणी यासोबत अप्पे खाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Conversions: गोमंतकीयांशी चाललेली प्रतारणा थांबवा, थोडी तरी जमीन गोवेकरांसाठी ठेवा..

IND vs ENG 3rd Test: गिलसाठी 'लॉर्ड्स टेस्ट' बनणार अग्निपरीक्षा, क्रिकेटच्या पंढरीत कसा आहे भारताचा रेकॉर्ड? आकडे भरवतात धडकी

Murder Case Goa: गुप्तांग कापले, डोके ठेचले! पर्रा येथे कामगाराचा कोल्ड बल्डेड खून; बाप लेकाला अटक

Viral Video: पठ्ठ्यानं लाथ मारताच ATM मधून पडला पैशांचा पाऊस, नंतर काय झालं? तुम्हीच पाहा व्हिडिओ

Goa Crime: कर्नाटकच्या तरुणांची गोव्यात मुजोरी; युवतीशी गैरवर्तन, दुचाकीला धडक, एक जखमी Watch Video

SCROLL FOR NEXT