चिकन सेंटर चालवणारी अ‍ॅनेट Dainik Gomantak
लाइफस्टाइल

चिकन सेंटर चालवणारी अ‍ॅनेट

कोरोनाकाळातही (Corona) तिने आपले चिकन सेंटर बंद ठेवले नव्हते कारण त्या वेळीच मागणी जास्त होती.

दैनिक गोमन्तक

अ‍ॅनेट नुनेसने आपलं चिकन सेंटर (Chicken Center) 2000 साली सुरू केले. त्याआधी ती नोकरी (Job) करत होती. नोकरी केल्याने थोडे पैसे हातात होते, ओळखी झाल्या होत्या. त्यांच्याकडूनही तिला खूप शिकायला मिळालं. पण तिला सतत वाटायचे की बाहेर काम केल्याने मुलांकडे, घराकडे दुर्लक्ष होत चालले आहे. फार वेळ घराबाहेर राहावे लागायचे. सकाळी पुन्हा धावपळ सुरू व्हायची. मुलींना आता आपली जास्त गरज आहे असे तिला वाटले आणि तिने नोकरी सोडली.

आता पुढे काय हा प्रश्न होता! व्यवसाय करायचा म्हटलं तर तो कोणता व कसा? मार्गदर्शन किंवा अनुभवाचे बोल सांगणारे कोणीच नव्हतं. मग तिने स्वत:च चिकन सेंटर (Chicken Center) सुरू करायचे ठरवले. त्यासाठी तिने तीन दिवसांचे प्रशिक्षण सरकारी पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन घेतलं. या प्रशिक्षणात तिला हा व्यवसाय कसा सुरू करायचा, कोंबडीच्या पिल्लांना कसं सांभाळायचं ते सगळं शिकायला मिळालं.

तिने कोंबडीची पिल्ले आणली. त्यांना वाढवलं तसा तिचा आत्मविश्वास वाढला. ती हे सगळं घरकाम आपल्या मुलींना सांभाळून करत होती. पिले मोठी झाली तशी तिने आणखीन पिल्ले विकत आणली. आता तिच्यासमोर यक्षप्रश्न उभा राहिला- कोंबडी (Chicken) मारायची कशी? हे काम तिनं कधी केलं नव्हतं. सेंटर उघडलं, पिल्लांना मोठं केलं, कोंबड्या तयार झाल्या, आता तिला त्या माराव्या लागणार होत्या. कशीबशी तिने एक कोंबडी मारली. आता व्यवसाय करायचा तर हे सगळेच करावे लागेल हे तिच्या लक्षात आलं आणि तिनं त्याप्रमाणे ते करायलाही सुरुवातही केली.

हळूहळू तिच्या चिकन सेंटरवर (Chicken Center) कोंबड्यांची मागणी वाढत गेली. तेव्हा तिनं आपल्या चिकन सेंटरवर कामगार ठेवले आणि व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. त्यावेळी ‘ओल्ड गोवा चिकन सेंटर’ (Old Goa Chicken Center) हे नाव नव्हतं पण ते नंतर झालं. पिल्ले आणून वाढवायच्या कामावर खूप खर्च होत होता. तिने विचार केला, तयार चिकन मिळत असेल तर बरं होईल. कर्नाटक, महाराष्ट्रातून (Maharashtra) चिकन पुरवणारे तयार होते. तिने चिकन मागवायला सुरुवात केली. आता एका फोनवर कर्नाटक व महाराष्ट्रातून चिकनचे व्यापारी चिकन पुरवतात. तिच्या चिकन सेंटरवर Chicken Center) लोकांची गर्दी असतेच. मागणीही खूप असते कारण तिची जागा स्वच्छ आहे. ती तशीच स्वच्छ राहावी यासाठी ती दक्ष असते. चिकन कापायच्या हत्यारांची सतत सफाई केली जाते. चिकन कापण्याआधी व कापल्यानंतर ही हत्यारे पुन्हा पुन्हा साफ केली जातात. हे सगळं गिऱ्हाईकांच्यासमोरच केलं जातं. या कामात ती स्वतः लक्ष देते. ती सांगते, या असल्या कामावर स्वत: लक्ष ठेवणे गरजेचे असते. कोंबड्यांना खाद्य-पाणी वेळच्यावेळी द्यावं लागतं.

कोरोनाकाळातही (Corona) तिने आपले सेंटर बंद ठेवले नव्हते कारण त्या वेळीच मागणी जास्त होती. बाजारात मासे-भाजी येत नव्हती. त्याकाळात चिकन न्यायला तिच्या सेंटरसमोर लोकांना रांगेने उभे राहावे लागायचे. पण तिने सुरक्षेची सगळी काळजी घेऊन चिकन पुरवणे चालूच ठेवले. अ‍ॅनेटचे जन्म गाव दिवार. दिवार हे सुपीक शेतजमिनीचे गाव. पण आता शेतीची जमीन ओस पडली आहे. हल्ली कोरोनामुळे (Corona) लोकांनी परत शेतात काम करायला, भाजीपाला पेरायला सुरुवात केली आहे. हे पाहून तिला बरं वाटतं. ती म्हणते, असे व्यवसाय पुन्हा चालू झाले पाहिजेत. महिलेचं (Women) जगणं हे तिच्यापुरतेच मर्यादित नसतं. ती त्याच्या कुटुंबाचा सतत विचार करत असते. पुरुषांपेक्षा महिलाच अधिक वेळ घरात असतात. त्यामुळे त्यांनाच सगळीकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. अ‍ॅनेटसुद्धा आपलं घर सांभाळून प्रामाणिकपणे आपला चालवते आहे. ती म्हणते, आपण या व्यवसायात समाधानी असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT