Women Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: मासिक पाळीत राग का येतो? जाणून घ्या कसे कराल कंट्रोल

काही मुलींना मासिक पाळीत जास्त राग येतो. यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Healthy Tips: मासिक पाळी दरम्यान अनेक मुलींचा मूड खूप बदलतो. कधी ती खूप आनंदी असते तर कधी ती चिडचिड करते. हे सर्व शरीरातील हार्मोनल बदलांमुळे होते. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे दोन हार्मोन्स मासिक पाळीच्या दरम्यान मूडवर परिणाम करतात. त्यामुळे मुलींचा मूड वारंवार बदलत राहतो. मासिक पाळीत या हार्मोन्सची पातळी अस्थिर होते, त्यामुळे मुली अधिक चिडतात. त्यामुळे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स मासिक पाळी दरम्यान मूडमधील चढउतार आणि रागासाठी जबाबदार असतात. 

  • राग का येतो?

मासिक पाळीच्या काळात महिलांना जास्त राग येण्याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे या काळात हार्मोन्समध्ये चढउतार होतात, ज्यामुळे मूड बदलतो. दुसरे म्हणजे, पोटदुखी आणि क्रॅम्प यामुळे शारीरिक अस्वस्थता येते. तेसच मुलींना राग येतो. तिसरे कारण म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यात अस्वस्थता वाटते. चौथे कारण म्हणजे झोप पुर्ण न होणे. या सर्व कारणांमुळे मासिक पाळीच्या वेळी मुलींना जास्त राग येतो.

रागावर कसे कंट्रोल कराल

  • व्यायाम करा 

योगा आणि मेडिटेशन केल्याने शरीरातील हार्मोन्स सुधारतात. यामुळे मूड देखील चांगला होतो. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा काही हलका व्यायाम करावा. जसे प्राणायम किंवा सुर्यनमस्कार काढणे.

  • बाहेर जा

मासिक पाळी दरम्यान फक्त झोपून राहिल्याने जास्त चिडचिड होते. यामुळे थोडा वेळ बाहेर चालायला जावे. मित्रांना भेटून गप्पा-गोष्टी करू शकता. याचा मनावर सकारात्मक परिणाम होईल आणि मूड स्विंगही कमी होईल.

  • कॉफी-चहाचे सेवन टाळावे

मासिक पाळी दरम्यान कॉफी आणि चहाचे सेवन कमी ठेवावे. यामुळे रागावर नियंत्रण ठेवता येते. तुम्ही ताज्या फळांचा रस पिऊ शकता.

  • जंक फूड खाणे टाळावे

मासिक पाळीच्या काळात अनेक वेळा पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड खातो. पण असे करू नका. कारण जंक फूड खाल्ले तर शरीरातील द्रवपदार्थाचे प्रमाण खूप वाढेल. ज्यामुळे सूज येणे, वजन वाढणे आणि इतर समस्या निर्माण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT